दिव्यांगत्व निदान झालेल्या तब्बल ८३ टक्के बालकांच्या उपचारात पडतो खंड

सम्राट कदम
Thursday, 3 December 2020

चालताना अडखळते, जन्मतःच हृदयाला छिद्रे असणे, थॅलसेमिया आदी विकासात्मक दिव्यांगत्व बालकांमध्ये आढळतात. वाढत्या वयाबरोबरच हे दिव्यांगत्व जाईल, असा जर तुमचा समज असले, तर सावधान ! पुण्यातील एका सर्वेक्षणानुसार निदान झालेल्या बालकांपैकी तब्बल ८३ टक्के बालकांच्या उपचारांत खंड पडला असून, जनजागृतीचा अभाव हे यामागील मुख्य कारण असल्याचे निदर्शनास आले आहे.

जन्मजात व्यंगांसंबंधिच्या पुणे जिल्ह्यात झालेल्या संशोधनाचा निष्कर्ष
पुणे - चालताना अडखळते, जन्मतःच हृदयाला छिद्रे असणे, थॅलसेमिया आदी विकासात्मक दिव्यांगत्व बालकांमध्ये आढळतात. वाढत्या वयाबरोबरच हे दिव्यांगत्व जाईल, असा जर तुमचा समज असले, तर सावधान ! पुण्यातील एका सर्वेक्षणानुसार निदान झालेल्या बालकांपैकी तब्बल ८३ टक्के बालकांच्या उपचारांत खंड पडला असून, जनजागृतीचा अभाव हे यामागील मुख्य कारण असल्याचे निदर्शनास आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जन्मजात व्यंग आणि बालकांचे दिव्यांगत्व संशोधन संस्था (बीडीसीडीआरसी), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आरोग्यशास्त्र विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमाच्या माहितीच्या आधारे संशोधन केले आहे. अपंगत्व किंवा जन्मदोष असलेल्या बालकांची ओळख पटविली असून, त्यांच्यावर उपचारही सुरू केले आहे. पण त्यापैकी अनेक बालकांच्या उपचाराकडे दुर्लक्ष केल्याचे दिसल्याचे बीडीसीडीआरसीच्या संचालिका डॉ. अनिता कार यांनी सांगितले. या संशोधनामध्ये भाग्यश्री राधाक्रिष्णन, तृष्णा गिरासे, धम्मसागर उजागरे, अर्चना पाटील यांचा समावेश आहे.

कुस्तीपटू राहुल आवारे बनले DySP; पुणे ग्रामीण पोलिस दलात होणार रुजू

या उपाययोजना आवश्‍यक

  • जन्मलेल्या प्रत्येक बालकाचे वेळोवेळी निदान करणे आवश्‍यक.
  • बालकाच्या विकासावर सातत्याने लक्ष द्यायला हवे.
  • ग्रामीण भागात उपचाराची सुविधा जवळच उपलब्ध व्हायला हवी.
  • पालकांसह समाजातील सर्वच घटकांची जनजागृती करणे आवश्‍यक.
  • संबंधी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप वाढविणे गरजेचे.

...फक्त लग्न मोडले म्हणून!

बालकांना वेळेवर उपचार मिळाले तर त्यांना शारीरिक दिव्यांगत्वावर आणि जन्मजात व्यंगांवर मात करता येते. त्यासाठी सरकारची आरबीएसके ही योजना आहे. परंतु, जनजागृतीचा अभाव आणि दूरवर असणारे आरोग्य केंद्र यामुळे बालकांच्या उपचारात खंड पडत आहे.
- डॉ. अनिता कार, संचालक, जन्मजात व्यंग आणि बालकांचे अपंगत्व संशोधन संस्था, पुणे

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: many as 83 Percentage of children diagnosed with disability are treated