मराठी राजभाषा दिन : शाळा, महाविद्यालयांमध्ये मराठीचा गोडवा

पिंपरी वाघेरे - महात्मा फुले महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषेचे महत्त्व समजावून सांगताना कवी विठ्ठल वाघ.
पिंपरी वाघेरे - महात्मा फुले महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषेचे महत्त्व समजावून सांगताना कवी विठ्ठल वाघ.

पिंपरी - शाळा, महाविद्यालये व शासकीय कार्यालयांमध्ये मराठी राजभाषा दिन गुरुवारी (ता. २७) उत्साहात साजरा झाला. मराठीबद्दलची आपुलकी, गोडी व जिव्हाळा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी शब्दकोडे, कविता व कथा सादर केल्या. काही ठिकाणी पुस्तकांचे प्रदर्शन भरविले होते.

‘कणा’चे सादरीकरण
चिंचवड येथील भारतीय जैन संघटना विद्यालयात कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्राध्यापिका अनुजा गडगे यांनी शपथ दिली. यावेळी प्राचार्य श्रीकांत कदम, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र कोकणे, प्रा. संतोष गांधी, प्रा. अनुजा गडगे उपस्थित होते. प्रा. चक्रधर टिळेकर यांनी मराठी भाषेचा इतिहास सांगितला. प्रा. किरण मासाळकर यांनी कुसुमाग्रजांची ‘कणा’ कविता सादर केली. मराठी विभागप्रमुख प्रा. संपत गर्जे यांनी संयोजन केले. किरण मासाळकर यांनी सूत्रसंचालन केले. नीलिमा जैन यांनी आभार मानले.

पारंपरिक वेशभूषा 
मोशीतील साधू वासवानी इंटरनॅशनल शाळेत सर्व शिक्षिका व विद्यार्थ्यांनी मराठमोळा पारंपरिक पोशाख परिधान केला होता. त्यामुळे सर्व वातावरण मराठीमय झाले होते. माधवराव पेशवेंच्या प्रमुख भूमिकेतील कलाकार चिन्मय पटवर्धन हे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छतेचा पांडुरंग’ यावर आधारित नृत्य, पथनाट्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. मुख्याध्यापिका आरती पाटील यांनी चिन्मयच्या लहानपणीच्या गोष्टींना उजाळा दिला.  

विविध गुणदर्शन 
महापालिकेच्या पिंपळे गुरव येथील शाळा क्र. ५४ मध्ये मराठी संस्कृती, परंपरा दर्शविणारे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम झाले. कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन झाले. मुलांनी मराठी घोषवाक्‍ये देऊन ‘मंगळागौर’, ‘ताटी उघडा ज्ञानेश्‍वरा’ ही एकांकिका सादर केली. ‘मराठी तुझ्याच पायी’ हा मराठी भाषेचा वेध घेणारा कार्यक्रम सादर केला. शिक्षिका संगीता आव्हाड यांनी ‘मुलूख’ हे स्फूर्तीगीत सादर केले. विद्यार्थ्यांनी फलक लेखन केले. योगिता परबत यांनी सूत्रसंचालन केले. 

विद्यार्थ्यांची काव्यमैफील
वाल्हेकरवाडी येथील महापालिका शाळा क्रमांक १८/१ ंयेथे विद्यार्थ्यांची काव्यमैफील रंगली. काव्य स्वरूपात विचारलेल्या प्रश्‍नाला काव्यातच उत्तर देणे, असा अनोखा कार्यक्रम झाला. डॉ. उज्वला ढमढेरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अभिनयावरून ‘विद्यार्थ्यांनी म्हण ओळखणे’ हा कार्यक्रम पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आला. डॉ, राधिका भोईटे, विजया भुतकर, अंजना ब्राम्हणकर, पुष्पा क्षीरसागर यांनी संयोजन केले. 

एकपात्री प्रयोग 
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयात डॉ. धनंजय वाघमारे यांनी कुसुमाग्रजांची माहिती दिली. प्राचार्य डॉ. अभय खंडागळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कुसुमाग्रजांच्या कवितांचे वाचन व एकपात्री प्रयोग विद्यार्थ्यांनी केले. ‘टू बी ऑर नॉट टू बी’ हे नटसम्राटमधील स्वगत भावेश निमसे याने सादर केले. किरण खरात, साक्षी बाचबुंडे यांनी एकपात्री प्रयोग केले. पल्लवी क्षीरसागर हिने स्वरचित कविता सादर केल्या. उपप्राचार्य डॉ. तुषार शितोळे उपस्थित होते. मराठी विभागप्रमुख प्रा. अपर्णा पांडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. संगीता लांडगे यांनी सूत्रसंचालन केले. संयोजन विभागप्रमुख प्रा. अपर्णा पांडे, डॉ. धनंजय वाघमारे, डॉ संगीता लांडगे यांनी केले. 

भाषा संवर्धनावर व्याख्यान
राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धनाविषयी व्याख्यान आयोजित केले होते. डॉ. वसंत गावडे, उपप्राचार्य प्रा. दादासाहेब पवार, डॉ. नेहा बोरसे, प्रा. गोपीचंद करंडे उपस्थित होते. प्रा. संगीता देवकर यांनी सूत्रसंचालन केले. मराठी विभागप्रमुख प्रा. सविता साबळे व प्रा. संगीता देवकर यांनी संयोजन केले. प्रा. दादासाहेब पवार यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

मराठी भाषा दिन उत्साहात
करंजगाव - नाणे मावळातील शाळांमध्ये मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त शाळांमध्ये कुसुमाग्रजांच्या कवितांचे गायन करण्यात आले. निबंध स्पर्धा, भित्तिचित्रे, प्रश्‍नमंजूषा, वक्तृत्व स्पर्धा असे कार्यक्रम करण्यात आले. कांबरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नटसम्राट नाटकातील भूमिका सादर केली. या वेळी मुख्याध्यापिका रुक्‍मिणी देवडकर, केंद्र प्रमुख युनूस मुलाणी उपस्थित होते. करंजगाव येथील गोल्डन ग्लेड्‌स शाळेत विद्यार्थ्यांना पेन व पुस्तके बक्षीस म्हणून देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com