मोदींच्या देशात आता उद्विग्न होण्यावाचून पर्याय काय? : अमोल पालेकर

स्वप्नील जोगी
रविवार, 20 ऑगस्ट 2017

'जवाब दो' आंदोलनाच्या व्यासपीठावर पालेकर बोलत होते.

पुणे : "ज्या देशाचे पंतप्रधान वैज्ञानिकांच्या परिषदेत 'गणपती हे हेड ट्रान्सप्लांटचे उत्तम उदाहरण' असल्याचे म्हणत असतील, अशा देशात वैज्ञानिक दृष्टिकोन कसा प्रसारित होऊ शकणार?... 'मुसलमान आणि ख्रिश्चन या धर्मांचे लोक मूळ भारतीय नसल्याने त्यांना या देशात अल्पसंख्याकांना दिल्या जाणाऱ्या कुठल्याही सुविधा मागण्याचा हक्कच नाही,' असं विधान करणारे आपले राष्ट्रपती असतील, तर ते नागरिकांना घटनात्मक संरक्षण कसे देऊ शकतील?... असे काही थेट प्रश्न अभिनेते अमोल पालेकर यांनी उपस्थित केले.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनास रविवारी (20 ऑगस्ट) चार वर्षे झाली, मात्र त्यांचे मारेकरी अद्याप मोकाट असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे करण्यात आलेल्या 'जवाब दो' आंदोलनाच्या व्यासपीठावर पालेकर बोलत होते.

पालेकर म्हणाले, "सरकार कुठल्याही 'रंगाचे' असो, त्यांपैकी कोणालाच सत्याला सामोरे जायची इच्छा नसते... ताकद तर त्याहून नसते. त्यामुळे न्याय मिळेलच याची शाश्वती कितपत ठेवावी, हा आज प्रश्न आहे ! माजी उपराष्ट्रपती ना 'तुम्ही बेधडकपणे जिथे सुरक्षित वाटेल, तिथे जायला मोकळे आहात', असे सांगितले जात असेल तर आपण या देशात उद्विग्न होण्यापालीकडे काही करू शकण्याची परिस्थिती नाही."

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

    Web Title: marathi news amol palekar slams narendra modi ganpati head transplant remark