मूलभूत संकल्पना सोप्या भाषेत

सुहास कोकाटे
मंगळवार, 23 जानेवारी 2018

या गोष्टी विसरू नका

अंकगणित या विषयामध्ये मूलभूत संकल्पना आणि सराव या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. स्पर्धा परीक्षेत अत्यंत महत्त्वाचा व निर्णायक ठरू शकणारा हा विषय असतो. ‘शिवनेरी’च्या तंत्रात गणिताच्या सर्व मूलभूत संकल्पना अत्यंत साध्या व सोप्या भाषेमध्ये समजावून दिलेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर होऊन या विषयाबद्दल निश्‍चितच आवड वाटू लागेल, याची खात्री आहे.
- सुहास कोकाटे, शिवनेरी फाउंडेशन

सध्याच्या काळातील कोणत्याही स्पर्धा परीक्षेतील दुसरा एक अविभाज्य असा घटक म्हणजे ‘बुद्धिमत्ता’ हा विषय असतो. या विषयाबद्दल विद्यार्थ्यांना वाटणारी सर्वांत मोठी भीती म्हणजे यामध्ये विचारले जाणारे संख्याशास्त्रीय व गणिती भाषेमध्ये मांडणी केलेले प्रश्‍न! असे प्रश्‍न समोर येताच काही विद्यार्थ्यांच्या पोटात भीतीने गोळा उभा राहतो. हे घडण्याचे प्रमुख कारण म्हणजे ‘संख्याशास्त्रीय/गणिती परिभाषेचे व्यवस्थितपणे आकलन न होणे’ हे होय. त्याचे परिणाम म्हणजे दिलेला प्रश्‍न व्यवस्थित न समजणे, त्यामुळे प्रश्‍नाचे व्यवस्थित व योग्य आकलन न होणे आणि पर्यायाने आपण चुकीचे उत्तर देतो. 

शिवनेरी फाउंडेशनने योग्य प्रकारच्या अभ्यासासाठी जे डिजिटल तंत्र विकसित केले आहे, त्या डिजिटल लेक्‍चर्सच्या माध्यमातून संख्याशास्त्रीय तसेच गणितीय परिभाषा फार सोप्या भाषेत समजावून सांगितल्या आहेत. साहजिकच परिभाषेचे आकलन झाल्यास प्रश्‍नातील माहिती, नेमके काय विचारले आहे, या सर्वांचे आपल्याला आकलन होते आणि प्रश्‍न सोडविणे फार सोपे होते.

संकल्पनांचे स्पष्टीकरण
विज्ञान या विषयाबद्दल बोलायचे झाले, तर यामध्येसुद्धा जोपर्यंत विद्यार्थ्यांना मूलभूत संकल्पना स्पष्ट होत नाहीत, तोपर्यंत त्यांना काहीच कळत नाही; परंतु एकदा का ती संकल्पना व्यवस्थित समजली, की मग साहजिकच या विषयाबद्दल विद्यार्थ्याच्या मनामध्ये आवड निर्माण होते. शिवनेरी फाउंडेशनच्या डिजिटल लेक्‍चर्सच्या माध्यमातून विज्ञान या विषयातील सर्व संकल्पना अगदी सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितल्या आहेत. एवढी खात्री आहे, की आपण कमीत कमी एक किंवा दोन वेळाच व्यवस्थित कान देऊन जरी ऐकले तरी आपल्या मनात हा विषय व त्यामधील सर्व संकल्पना या कायमस्वरूपी बिंबल्याखेरीज राहणार नाही. ‘‘एकदा का मूलभूत संकल्पना व्यवस्थित समजली, जरी प्रश्‍न कसादेखील फिरवून विचारला तरी आपण त्याचे योग्य ते उत्तर देऊ शकतो’’ म्हणूनच आम्ही नेमका ‘संकल्पना’ या मुळावरच घाव टाकला आहे, हे लक्षात घ्या.

प्रश्‍न, शंकांचे निराकरण
अथक परिश्रम करण्याची जिद्द मनामध्ये बाळगून, यशाची स्वप्ने आपल्या उराशी कवटाळून आपल्यासारखे हजारो-लाखो तरुण व तरुणी स्पर्धा परीक्षांचा मार्ग धुंडाळत असतात. विद्यार्थ्यांच्या या नाजूक मन:स्थितीचा फायदा उठविणाऱ्यांचा आजकाल स्पर्धा परीक्षेच्या बाजारामध्ये सुळसुळाट दिसून येतो. आणखी एक महत्त्वाचे म्हणजे सध्या बाजारात उपलब्ध असणारी पुस्तके किंवा नोट्‌स, व्याख्यानमाला, डिजिटल लेक्‍चर्स पाहिली त्या सर्वांमध्ये नेहमी एक प्रकारची कमतरता दिसून येते, ती म्हणजे या सर्वांची रचनाच प्रत्यक्षात अशी असते, की यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उपस्थित होणारे विचार, शंका हे भाऊगर्दी करतात. किंबहुना विद्यार्थ्याच्या मानसिक गोंधळामध्ये अधिकच भर टाकली जाते; परंतु त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे ही काही केल्या मिळत नाहीत. 

मूलभूत संकल्पनांवर भर
फार मोठ्या आशा दाखविण्यापेक्षा आम्हाला असे वाटते, की जर विद्यार्थ्याला सर्व मूलभूत संकल्पना व्यवस्थित समजावून दिल्या, म्हणजेच त्यांचा अभ्यासाचा पाया जर आपण भक्कम करून दिला, तर त्यावर आपल्यासारखे हजारो-लाखो तरुण-तरुणी आपल्या गरुड भरारी स्वप्नांच्या दुनियेतील बंगला सत्यात उतरवू शकाल. नेमके ‘प्रत्येक मूलभूत संकल्पना व्यवस्थित समजावून सांगणे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनात माजणारे विचारांचे काहूर शांत होईल.’ हेच ध्येय समोर ठेवून सामान्यविज्ञान, अंकगणित व बुद्धिमत्ता या तीन विषयांच्या अभ्यासक्रमाची रचना या डिजिटल तंत्रात केली आहे. 

अडचणी सोडविण्यावर भर
एकीकडे या विषयांबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेली धास्ती दूर करणे, तसेच दुसरीकडे या विषयांमध्ये सर्व मूलभूत संकल्पना व्यवस्थितपणे समजावून देऊन स्पर्धा परीक्षेमध्ये अधिकाधिक गुण मिळवून आपली स्वप्नपूर्ती साधण्यासाठी या डिजिटल नोट्‌सवर भर देण्यात आलेला आहे. परीक्षेची प्रत्यक्ष तयारी करताना तसेच प्रश्‍नपत्रिका सोडविताना विद्यार्थ्यांना प्रश्‍नांचे अवघड स्वरूप, त्यासाठी करावा लागणारा सराव उत्तरांचे आवश्‍यक व योग्य स्पष्टीकरण तसेच प्रश्‍नांमधील मुख्य खाचा-खोचा याबाबतीत येणाऱ्या सर्व अडचणी यामध्ये सोडविण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आलेला आहे. परीक्षेमध्ये ‘वेळ’ ही फार महत्त्वाची बाब असल्यामुळे कमी वेळेत उत्तर देण्यासाठी कोणत्या प्रकारे विचार करण्यात यावा, यासाठी योग्य त्या सूचनांचा वापर करून मार्गदर्शन केलेले आहे. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंकांना वावच राहू नये, या पद्धतीने या सर्व विषयांची रचना करून स्वयंस्पष्ट स्पष्टीकरणेही देण्यात आलेली आहेत. जेणेकरून त्यांच्या मनात उठणाऱ्या प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर त्यांना सहजपणे मिळेल व त्यांचे अशांत मनदेखील शांत होईल. 

सोप्या भाषेत लेक्‍चर्स
या सीरिजमधील प्रत्येक लेक्‍चर म्हणजे ही त्या-त्या अभ्यास घटकामधील तसेच विषयामधील एक स्वतंत्र अशी मूलभूत संकल्पना आहे. विद्यार्थ्यांना संबंधित संकल्पनेचा मूलभूत अर्थ समजावून प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर हमखास देता येऊ शकते. या लेक्‍चर्सची भाषा ही अत्यंत साधी, सोपी दिलेली स्पष्टीकरणे ही नेमकी व मुद्देसूद तसेच वेळोवेळी दिलेल्या महत्त्वपूर्ण सूचना यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यालादेखील या विषयाबद्दल  मनात असलेली भीती दूर होऊन रस वाढेल व यामध्ये गती वाढून ते आपले ध्येय लवकरात लवकर गाठू शकतील. 

या गोष्टी विसरू नका

आधीचे लेख आणि बातम्या :

Web Title: marathi news shivneri foundation suhas kokate students