esakal | महाशिवरात्रीनिमित्त मार्केट यार्डात रताळांची आवक वाढणार 
sakal

बोलून बातमी शोधा

In the market yard increase in the supply of Sweet potato for Mahashivratri

बाजारात कराड, मलकापूर भागातून 500 पोती, तर करमाळा भागातून एक ट्रक रताळांची आवक झाली. कराड, मलकापूर भागातील रताळी चवीला गोड, गावरान, आकाराने लहान आणि दिसासयाला आकर्षक असतात. त्यामुळे ग्राहकांकडून या रताळीला जास्त मागणी असते. परिणामी, यास इतर रताळांच्या तुलनेत जास्त भाव मिळतो. येत्या दोन दिवसात आणखी आवक वाढणार असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.

महाशिवरात्रीनिमित्त मार्केट यार्डात रताळांची आवक वाढणार 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मार्केट यार्ड(पुणे) : महाशिवरात्र शुक्रवारी (ता. 21)  असल्याने तरकारी विभागात रताळांची आवक सुरू झाली आहे. रविवारी घाऊक बाजारात दर्जानुसार दहा किलोस 180 ते 200 रुपये भाव मिळाला. तर, आकाराने मोठ्या असलेल्या करमाळा भागातील रताळांना दहा किलोस 120 रुपये भाव मिळाला. तसेच किरकोळ बाजारात ३० ते ४० रुपये विकला जात आहे.

चिकन बिनधास्त खा, कोरोनाशी संबंध नाही!

बाजारात कराड, मलकापूर भागातून 500 पोती, तर करमाळा भागातून एक ट्रक रताळांची आवक झाली. कराड, मलकापूर भागातील रताळी चवीला गोड, गावरान, आकाराने लहान आणि दिसासयाला आकर्षक असतात. त्यामुळे ग्राहकांकडून या रताळीला जास्त मागणी असते. परिणामी, यास इतर रताळांच्या तुलनेत जास्त भाव मिळतो. येत्या दोन दिवसात आणखी आवक वाढणार असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.

Video : पुणे : इंजिनिअरिंगची पुस्तके मिळणार आता भाड्याने

गेल्या वर्षी दुष्काळाचा फटका बसल्याने रताळांचे उत्पन्न घटले होते. त्यामुळे तुलनेने आवक झाली होती. त्यामुळे जास्त भाव मिळाला होता. गेल्या वर्षी राज्यातील रताळांना किलोस 25 ते 30 रुपये भाव मिळाला होता. तो यावर्षी कमी मिळत आहे. दोन-तीन दिवसांत होणाऱ्या आवकवरून नक्की किती भाव मिळेल, याचे चित्र स्पष्ट होईल. असे श्री छत्रपती शिवाजी आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष अमोल घुले यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

''बाजारात पुढील दोन दिवसात रताळांची मागणी वाढेल. बाजारात अजून कर्नाटकातून रताळी दाखल झालेली नाहीत. येत्या काही दिवसात कर्नाटकातील रताळी बाजारात दाखल होणार आहेत.''
- अमोल घुले, उपाध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी आडते असोसिएशन.

पुणे विमानतळावर अपघात होता होता वाचला; वाचा काय घडले!

loading image