साडेबारा कोटी गेले खड्ड्यात

प्रवीण डोके
Sunday, 20 December 2020

गुलटेकडी येथील मार्केट यार्डात काही महिन्यांपूर्वी गूळ-भुसार, तरकारी, फळ विभागात अनेक ठिकाणी रस्त्यांचे डांबरीकरण केले होते. येथील विविध कामांसाठी सुमारे १६ कोटी रुपयांची निविदा काढून त्‍यातील साडेबारा कोटी रुपये खर्चही झाले. परंतु, काही दिवसांतच या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी अर्धवट कामे झाली आहेत.

मार्केट यार्ड - गुलटेकडी येथील मार्केट यार्डात काही महिन्यांपूर्वी गूळ-भुसार, तरकारी, फळ विभागात अनेक ठिकाणी रस्त्यांचे डांबरीकरण केले होते. येथील विविध कामांसाठी सुमारे १६ कोटी रुपयांची निविदा काढून त्‍यातील साडेबारा कोटी रुपये खर्चही झाले. परंतु, काही दिवसांतच या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी अर्धवट कामे झाली आहेत. त्यामुळे रस्तादुरुस्तीसाठी खर्च केलेले कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याची भावना व्यापारी आणि ग्राहक व्यक्त करत आहेत.

येथील बाजार आवारात व्यापारी, कामगार, विक्रेते, खरेदीदारांसह दररोज २० ते २५ हजार नागरिकांसह ग्राहकांची ये-जा असते. बाजारात येणाऱ्यांना या रस्त्यावरील खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. बाजारात अनेक ठिकाणी नवीन रस्त्यांवरच मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथील कामाच्या दर्जाबाबत व्यापाऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. येथे जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन प्रवास धोकादायक झाला आहे. त्यामुळे वाहनांचे नुकसान आणि अनेक ठिकाणी अपघातही होत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ज्या ठिकाणी नवीन रस्ता झाला, तोच रस्ता जलवाहिनी टाकण्यासाठी पुन्हा खोदण्यात आला आहे. मात्र, त्याची दुरुस्तीही करण्यात आली नाही. याबाबत बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांना शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता फोनद्वारे संपर्क साधला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

ना पूर्ण पगार, ना नोकरीची हमी; अन् वरून राजीनामा देण्यासाठी दबाव!

झालेले रस्ते पुन्हा उखडले
बाजार समितीने २०१८ मध्ये १६ कोटी १९ लाख ५२ हजार ७७२ रुपयांच्या ई-निविदा काढून रस्त्यांची कामे सुरू केली होती. परंतु अद्यापही बाजारात रस्त्यांची कामे ६० ते ७० टक्केच झाली आहेत. त्यातच झालेले रस्तेही उखडले आहेत. त्यामुळे निविदा काढताना ठेकेदारांना मुदतीची मर्यादा घालून दिली का नाही?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, आतापर्यंत १२ कोटी ४५ लाख ७४ हजार ५४ रुपये रस्त्यांच्या कामांसाठी संबंधित ठेकेदाराला दिले आहेत.

पुणे बंगळुर महामार्गावर अवजड वाहनांवर कारवाईस सुरुवात

व्यापारी वर्षाला कोट्यवधी रुपयांचा सेस भरतात; परंतु बाजार समिती व्यापाऱ्यांना मूलभूत सुविधाही पुरवू शकत नाही. नवीन झालेले रस्ते पुन्हा खोदले आहेत. तेथे पडलेले खड्डे बुजवलेले नाहीत. यामुळे सतत अपघात होत आहेत.
- पोपटलाल ओस्तवाल, अध्यक्ष, दि पूना मर्चंट चेंबर

मुलगी माझी नाही म्हणत केली चिमुकलीची हत्या; पसार बापाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बाजार समितीत १५ दिवसांपूर्वी चेंबरचे पदाधिकारी आणि प्रशासक यांच्यात बैठक झाली होती. त्यामध्ये प्रशासकांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून आठ दिवसात बाजारातील अर्धवट कामे पूर्ण करा. तसेच, सर्व खड्डे तातडीने बुजवून घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यावर अद्यापही कार्यवाही झाली नाही.
- प्रवीण चोरबेले, माजी अध्यक्ष, दि पूना मर्चंट चेंबर

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Market Yard Road Pit