पुण्यात बाजारपेठा सुरू होऊन उपयोग काय? ग्राहक, व्यापाऱ्यांचा सवाल

Markets started in Pune but no road barricades were removed.jpg
Markets started in Pune but no road barricades were removed.jpg

पुणे : मध्यवर्ती भागातील प्रमुख बाजारपेठा सुरू झाल्या; मात्र, बाजारपेठांत ये-जा करता येईल, याकरिता अजून रस्त्यांवर बॅरिकेडस, पत्रे जागेवरच राहिले आहे. त्यामुळे दुकान कसे गाठायचे ? याची चिंता व्यापारी-कामगारांना लागली आहे. दुकाने उघडायला परवानगी दिली, मग ग्राहकांची वाट का अडविल्याचे चित्र आहे. लक्ष्मी रस्त्यांसह सदाशिव पेठ, नारायण पेठेला जोडलेल्या रस्त्यांवरील बॅरिकेड काढलेले नाही. त्यामुळे बाजारपेठा सुरू होऊन उपयोग काय, असा प्रश्‍न ग्राहक आणि व्यापाऱ्यांचा आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

रस्त्यांवरचे विशेषत: वर्दळीच्या भागांतील बॅरिकेडस काढण्याबाबत पोलिस आयुक्‍तांशी चर्चा केल्याचे महापालिका आयुक्त सांगत आहेत. तर बॅरिकडे काढता येणार नाहीत, असे उत्तर पोलिसांकडून मिळत आहे. त्यामुळे जीवनाश्‍यक वस्तुंच्या खरेदीसाठी मुभा दिलेल्या नागरिकांनी नेमकी कोठून ये-जा करायची ? याची अडचण झाली आहे. 
लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यांत प्रामुख्याने लक्ष्मी रस्त्यासह टिळक रस्ता, कर्वेनगर, शास्त्री रस्त्यावरची बाजारपेठ खुली करण्यात आली आहे.

पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत महत्त्वाची बातमी; मंडळांनी घेतला निर्णय

दुसऱ्या दिवशी म्हणजे, गुरुवारी लक्ष्मी रस्त्यावरची बहुतांशी दुकाने उघडली आणि काही प्रमाणात ग्राहकही दिसू लागले. मात्र, या रस्त्याला जोडलेले सर्व अंतर्गत रस्ते बंद असून, त्याठिकाणी पत्रे उभारले आहेत. त्यामुळे उपनगरांत येणाऱ्या मालक आणि कामगारांना पोचता येत नसल्याचे दिसून आले आंहे. तर ग्राहकांनाही चकरा माराव्या लागत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. व्यापारी, कामगार आणि ग्राहक हे लोकमान्य टिळक चौकातून (अलका चौक) नो एन्ट्रीतून लक्ष्मी रस्त्यावर येत आहेत. तर काही ग्राहक रस्ता नसल्याने बाजारपेठेत येत नसल्याचे दुकानदारांनी सांगिलते. त्यामुळे बाजारपेठेला जोडलेले आणि आता बंद असलेले रस्ते सुर ठेवण्याची त्यांची मागणी आहे. 

न्यायालयामध्ये गर्दी कमी होईना; जिल्हा न्यायाधीशांनी घेतला महत्वाचा निर्णय

"व्यवहार सुरू झाल्यानंतर रस्त्यांवरील वाहतूक वेगाने पुढे सरकणे अपेक्षित आहे. त्यासाठी बॅरिकेडस कमी करण्याबाबत पोलिसांशी चर्चा केली आहे. ते काढण्यात येतील. मात्र, विनाकारण लोक रस्त्यांवर येण्याच्या शक्‍यतेने ते काढलेले नाहीत. मात्र ते काढून गैरसोय दूर करू.'' 
- शेखर गायकवाड, आयुक्त महापालिका 

पुण्यात आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यु 


"रोजगार थांबविणे परवडणारे नसल्याने उद्योग-व्यवसाय सुरू करण्यास परवानगी आहे. तेव्हा, बाजारपेठांमधील वाहतूक वयवस्थाही सुरळीत हवी, परंतु, लक्ष्मी रस्त्यालगतच चहूबाजुंनी बॅरिकेडस उभारले आहेत. तेव्हा ग्राहक, कामगार आणि मालाची ने-आण कशी होणार ? रस्ते करायला हवेत.'' 
- संजय बिहानी, व्यावसायिक, लक्ष्मी रस्ता.

पुण्यात घरेलू कामगारांवरून सोसायट्यांमध्ये सुरू झाले वाद; वाचा सविस्तर बातमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com