

Balasaheb Auti Announces Nationwide Protest Against MRP System on May 25 in Delhi
esakal
-डी. के. वळसे पाटील
मंचर: वस्तूंवरील छापील कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) ही ग्राहक संरक्षणाचे साधन न राहता कंपन्यांच्या नफेखोरीचे माध्यम बनली असल्याचा आरोप करत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने आता देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या सोमवारी (ता.२५ मे) रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे भव्य ‘सत्याग्रह’ आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष तथा राष्ट्रपती पुरस्कार विजेते बाळासाहेब औटी यांनी केली.