esakal | मुख्यमंत्री योगींनी राजीनामा द्यावा; पुण्यात मातंग समाजाची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्री योगींनी राजीनामा द्यावा; पुण्यात मातंग समाजाची मागणी

हाथरस येथील दलीत युवतीच्या अत्याचार प्रकरणी उत्तर प्रदेश सरकार आणि प्रशासन पीडितेला  आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय देऊ शकले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा अशी आग्रही मागणी मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली.

मुख्यमंत्री योगींनी राजीनामा द्यावा; पुण्यात मातंग समाजाची मागणी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : हाथरस येथील दलीत युवतीच्या अत्याचार प्रकरणी उत्तर प्रदेश सरकार आणि प्रशासन पीडितेला  आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय देऊ शकले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा अशी आग्रही मागणी मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हाथरस प्रकरणी देशभर लोक आंदोलन करीत आहेत, तरीसुद्धा उत्तर प्रदेश सरकार या प्रकरणाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मातंग समाजाच्या विविध संघटनेकडून आज करण्यात आला. या सरकारचा निषेध म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे स्टेशन येथे तीव्र निदर्शने करण्यात आली.

दरम्यान, या वेळी योगी सरकार राजीनामा द्या, पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे, बंद करा, बंद करा दलितांवरील हल्ले बंद करा अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता.

पेपर देता आला नाही? टेन्शन घेऊ नका; पुणे विद्यापीठ घेणार 'स्पेशल परीक्षा'!

या आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री ,मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक रमेश बागवे,राष्ट्रवादीचे नेते सुभाष जगताप, रिपबलिकन मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे ,शिवसेनेचे नेते बाळासाहेब भांडे,अनिल हातागळे ,नगरसेवक अविनाश बागवे ,राष्ट्रवादी सामजिक न्याय शहराध्यक्ष विजय डाकले, महिला अध्यक्ष सुरेखा खंडागळे, दलीत महासंघ जिल्हाध्यक्ष आनंद वैराट, भास्कर नेटके, रावसाहेब खंडागळे, या मातंग समाजातील  प्रमुख संघटनांचे नेते यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. तर या वेळी पुणे शहरातील विविध पक्ष संघटनाचे कार्यकर्ते, महिला व युवक मोठ्या संख्यने आंदोलनात सहभागी झाले होते.

वृत्तपत्र विक्रेत्याची मुलगी सपना झाली साखर कारखान्यात कामगार कल्याण अधिकारी

loading image