भीमा, इंद्रायणीचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात : पवार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 11 February 2020

  • पवार यांनी घेतला आढावा
  • 17 फेब्रुवारीला मुख्य सचिवांसमवेत बैठक 
     

पुणे : भीमा आणि इंद्रायणी नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आढावा घेतला. तसेच, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या. दरम्यान, "नमामि चंद्रभागा' प्रकल्पासह इंद्रायणी नदी स्वच्छता मोहिमेबाबत 17 फेब्रुवारीला मुंबईत मुख्य सचिवांसमवेत बैठक होणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या बैठकीस जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते, विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्‍त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर, जिल्हा प्रशासन अधिकारी चंद्रकांत खोसे यांच्यासह जिल्हा परिषद, पीएमआरडीए, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते. 

Delhi Election : तिवारी म्हणाले होते 'ट्विट जपून ठेवा'; निकालनंतर होतायेत ट्रोल

भीमा नदी पंढरपूर येथे चंद्रभागा म्हणून ओळखली जाते. भीमा आणि इंद्रायणी नद्यांमधील प्रदूषण वाढले आहे. या संदर्भात पंढरपूर येथे वारकऱ्यांनी पवार यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले होते. त्यावर पवार यांनी या नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी साखर संकुल येथे मंगळवारी (ता. 11) बैठक घेतली. 

खूशखबर ! या कंपनीत आहे २० हजार कर्मचाऱ्यांची मेगाभरती

या वेळी विभागीय आयुक्‍त डॉ. म्हैसेकर यांनी राज्य सरकारच्या "नमामि चंद्रभागा' प्रकल्पांतर्गत उपाययोजनांबाबत सादरीकरण केले. तर, जिल्हाधिकारी राम यांनी इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्यासह प्रदूषण रोखण्याबाबत सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. 

Delhi Election : 'आय लव्ह यू' म्हणत विजयानंतर केजरीवालांनी दिली 'ही' प्रतिक्रीया

"नद्यांचे प्रदूषण रोखून त्यांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने आवश्‍यक निधीसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवावेत. आळंदी येथील भाविकांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्यासाठी आवश्‍यक ठिकाणी बंधारे बांधण्यात यावेत. तसेच, दौंड, कुरकुंभ, इंदापूर, चाकणसह अन्य औद्योगिक वसाहतींमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच ते पाणी नदीत सोडण्यात यावे. तसेच, नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी आवश्‍यक सर्व उपाययोजना कराव्यात,' अशा सूचना पवार यांनी दिल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Measures should be taken to prevent pollution of Bhima Indrayani says Pawar