अपघातानंतर रुग्णवाहिकांसोबत मॅकेनिकही 

अक्षता पवार
Tuesday, 23 February 2021

राज्यभरातील जिल्हा मार्गापासून अगदी देशातील महानगरांना जोडलेल्या महामार्गावरचे अपघातांसारख्या घटनांमध्ये प्रवासी, वाहनचालकांच्या मदतीसाठी रात्री- अपरात्री रुग्णवाहिकांसोबत मॅकेनिकही धावत आहेत.

पुणे - राज्यभरातील जिल्हा मार्गापासून अगदी देशातील महानगरांना जोडलेल्या महामार्गावरचे अपघातांसारख्या घटनांमध्ये प्रवासी, वाहनचालकांच्या मदतीसाठी रात्री- अपरात्री रुग्णवाहिकांसोबत मॅकेनिकही धावत आहेत. जखमींना तातडीच्या उपचारांसह अपघातातील वाहने लगेचच रस्त्याच्याकडेला घेतली जातात. ही यंत्रणा उभारण्यासाठी वाहन, चालक, मालक सामाजिक संघाने पुढाकार घेतला आहे. 

लिंगाण्यावर फडकला 30 फुटी भगवा व्हिडिओ होतोय व्हायरल

रस्ते अपघातांमध्ये प्रवाशांसह वाहनचालकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. त्यात आयत्यावेळी मदत न मिळाल्याने अपघातांमधील जखमींना जीव गमवावा लागल्याचेही निदर्शनास आले आहे. वाहने तास न् तास रस्त्यातच उभी राहात असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्‍न उद्भवतो. तर बऱ्याच वेळी अपघात झाल्यावर चालकांना मारहाण केले जाते. त्यामुळे त्यांचे संरक्षणदेखील महत्त्वाचे आहे. या बाबींवर उपाय म्हणून अनेक वर्षांपासून वाहनचालक म्हणून काम करणाऱ्या पुण्यातील अन्वर शेख आणि आलम शेख यांनी वाहन, चालक, मालक सामाजिक संघाची स्थापना केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या संघाने आता आपल्या कामाचा आवाका वाढविला आहे. त्यातून जखमींना थेट उपचार देण्यासाठी चोवीस तास रुग्णवाहिका पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे शक्य त्याठिकाणी डॉक्टर आणि अन्य कर्मचारी उपलब्ध असेल. महत्त्वाचे म्हणजे, वाहनांच्या दुरुस्तीची यंत्रणा राहणार आहे.  

संघाचे अध्यक्ष आलम शेख म्हणाले, ‘‘रस्त्यांवरील अपघातात चालक आणि प्रवाशांना मारहाण आणि वाहनांची तोडफोड केली जाते. अशा स्थितीत अडचणीत सापडलेल्या चालक-प्रवाशांसाठी हा संघ काम करीत आहे. सध्या देशातील विविध भागातून सदस्य जोडले गेले आहेत. या कामासाठी प्रत्येक भागात सदस्यांना नेमण्यात आले आहे. स्थानिक भागातील सदस्यांमुळे मदतकार्य करणे सोपे झाले आहे.’

पुणेकरांनो, रात्री घराबाहेर पडताय, मग ही बातमी नक्की वाचा

अशी आहे यंत्रणा 

  • चार वर्षांपासून देशभरात सुविधा
  • दीड लाख मालक चालकांना मदत
  • तब्बल तीन लाख सदस्यांकडून सेवा
  • सुमारे २५० व्हॉट्सॲप ग्रुप

बारामतीत पॉवर पेट्रोलचं शतक; उच्चांकी इंधनदराची नोंद

व्हॉट्सअॅपद्वारे मदत सोपी 
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांतील शहर आणि तालुक्यानुसार मोटार मेकॅनिक आणि वाहनांच्या सुट्या भागांची विक्री करणाऱ्या दुकानदारांची यादी तयार केली आहे. तसेच वाहनचालक, दुरुस्ती करणारे आणि सदस्यांना एकत्र आणून विविध व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केले आहेत. अपघात आणि अन्य काही घटनांची माहिती मिळताच, ती त्या-त्या भागातील सदस्यांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पोचते. माहिती मिळताच संबंधित ठिकाणी नेमलेला सदस्य मदतकार्य करतो, असे संघाचे सल्लागार अन्वर शेख यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mechanics with ambulances after the accident