‘सेव्हन मंत्रा’च्यावतीने खास ‘गणेश पूजा साहित्य संचा’ची बास्केट

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 August 2020

विघ्नहर्ता गणरायाच्या स्वागतासाठी आता घरोघर जय्यत तयारी सुरू झाली आहे. कोरोनाच्या संकटात बाप्पांचा उत्सव घरी तेवढ्याच उत्साहात साजरा करण्यासाठी खरेदीला प्रारंभ झाला आहे. ही खरेदी अधिक सुरक्षित, खात्रीशीर व्हावी, यासाठी ‘सेव्हन मंत्रा’च्यावतीने खास ‘गणेश पूजा साहित्य संचा’ची मीडियम बास्केट उपलब्ध करून दिली आहे.

पुणे - विघ्नहर्ता गणरायाच्या स्वागतासाठी आता घरोघर जय्यत तयारी सुरू झाली आहे. कोरोनाच्या संकटात बाप्पांचा उत्सव घरी तेवढ्याच उत्साहात साजरा करण्यासाठी खरेदीला प्रारंभ झाला आहे. ही खरेदी अधिक सुरक्षित, खात्रीशीर व्हावी, यासाठी ‘सेव्हन मंत्रा’च्यावतीने खास ‘गणेश पूजा साहित्य संचा’ची मीडियम बास्केट उपलब्ध करून दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे संकट वाढत आहे. अशा वेळी घराबाहेर पडण्यासाठी मर्यादा आल्या आहेत. मात्र, कोणत्याही परिस्थितीत लाडक्‍या गणपती बाप्पाच्या स्वागतात कोणताही खंड पडणार नाही, असा निश्‍चय गणेश भक्तांनी केला आहे. गणेशभक्तांचा हा उत्साह पाहून आणि गणरायाच्या आगमनानंतर कोरोनाचे संकट कमी होईल, हा दृढविश्‍वास कायम ठेवत ‘सेव्हन मंत्रा’ ने घरपोच पूजा साहित्य देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ‘ॲग्रोवन-सेव्हन मंत्रा’च्यावतीने घरपोच भाजीपाला आणि फळे पुरविण्यात येतात. त्यासोबत नागरिकांच्या खास मागणीनुसार नामांकित ब्रॅण्डच्या पूजासाहित्याचा संचही तयार करण्यात आला असून, तो घरपोच पोचविला जाणार आहे. या संचाला पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांची मोठी मागणी असून, अनेकांनी आपला संच बुक केला आहे. 

पुण्यातील कोरोनाग्रस्तांच्या अडचणी काही कमी होईनात; रक्तसाठा पडतोय कमी!

हा संच आता दोन प्रकारात उपलब्ध करण्यात आला आहे. यात मेगा पूजा साहित्य संचात २७ वस्तू देण्यात आल्या आहेत. आता गणेशभक्तांच्या मागणीनुसार मीडियम पूजा साहित्यही उपलब्ध करून देण्यात आले असून, त्यात २३ प्रकारचे पूजा साहित्य देण्यात आले आहे. या संचाची किंमत ४९९ एवढी ठेवण्यात आली आहे. त्याचीही अगाऊ नोंदणी सुरु झाली आहे. ही नोंदणी www.sevenmantras.com या वेबसाइटवर करता येईल.

यंदा गणपती विसर्जन मिरवणूक निघणारच नाही!​

असा आहे मीडियम पूजा साहित्य संच 
अगरबत्ती, कापूर, हळद, कुंकू, गुलाल, अष्टगंध, मध, अत्तर, गुलाबपाणी, गोमूत्र, हळकुंड, बदाम, खारीक, खोबरे तुकडा, सुपारी, जानवे, फुलवात, समईवात, वस्त्रमाळ, धूप, काडेपेटी, वस्त्र, आरतीसंग्रह पुस्तिका.

रायगड बलात्कार-खून प्रकरण : 'नाहीतर मंत्रालयाला घेराव घालू'; मराठा संघटनांनी दिला इशारा​ 

ज्येष्ठा गौरी नैवेद्यासाठी घरपोच भाजीपाला
ज्येष्ठा गौरी नैवेद्यासाठी भाज्यांचे महत्व ओळखून सेव्हन मंत्राने ‘ज्येष्ठा गौरी नैवेद्य भाजीपाला बास्केट’ सादर केली आहे. यामध्ये १७  भाज्यांचा समावेश आहे. ‘अळू पाने, आंबट चुका, लाल माठ, शेपू, कारले, दुधी भोपळा, काकडी, पडवळ, भोपळा, दोडका, गाजर, सुरण, रताळे, बटाटा, गवार, वाटाणा, शेवगा, भेंडी, मका कणीस यापैकी कोणत्याही १७ भाज्यांचा समावेश या बास्केटमध्ये असेल. आजच www.sevenmantras.com वेबसाइटला भेट देऊन, आपली बास्केट बुक करा.

लॉकडाऊनमध्ये गंभीर गुन्हे घटले पण...; काय सांगतो पुणे पोलिसांचा रिपोर्ट

दर गुरुवारी ‘एक्‍झॉटिक व्हेजिटेबल’
आरोग्याची काळजी घेतल्यास दवाखान्याच्या फेऱ्या वाचवता येतात, असा सल्ला अनेकदा तज्ज्ञांकडून दिला जातो. त्यासाठी योग्य आहाराचीही शिफारस केली जाते. नेमकी हीच बाब ओळखून सेव्हन मंत्राने ‘एक्‍झॉटिक व्हेजिटेबल्स बास्केट’ (Exotic vegetable basket) सादर केली आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक गुरुवारी ही बास्केट घरपोच केली जाणार आहे. या बास्केटमध्ये ब्रोकोली, रेड कॅबेज, बेबी कॉर्न, झुकिनी, चेरी टोमॅटो, इटालियन बेसिल, आइसबर्ग (लेट्युस), रेड व यलो बेलपेपर या आठ भाजीप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. ‘www.sevenmantras.com या वेबसाइटला भेट देऊन, ही एक्‍झॉटिक व्हेजिटेबल्स बास्केट बुक करता येईल. दर गुरूवारी ही बास्केट घरपोच केली जाणार आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Medium basket of special Ganesh Pooja Sahitya Sancha on behalf of Seven Mantra