esakal | महिनाभरानंतरही गौतम पाषाणकरांचा ठावठिकाणा नाही; राजकीय व्यक्तीचं नाव गुलदस्त्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Gautam_Pashankar

पाषाणकर बेपत्ता झाल्याच्या 18 दिवसांनंतर आता एक आशेचा किरण दिसून आला होता. पाषाणकर हे कोल्हापूरमधील एका रेस्टॉरंटच्या बाहेर सीसीटीव्हीत दिसून आले होते.

महिनाभरानंतरही गौतम पाषाणकरांचा ठावठिकाणा नाही; राजकीय व्यक्तीचं नाव गुलदस्त्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून बेपत्ता झालेल्या उद्योजक गौतम पाषाणकर यांचा अद्यापही ठावठिकाणा लागलेला नाही. त्यांच्या बेपत्ता होण्याला 29 दिवस उलटले आहेत. त्यामुळे पाषाणकर नेमके कुठे आहेत, या प्रश्‍नाचे गूढ अद्याप उलगडलेले नाही.

पाषाणकर यांनी त्यांच्या मोटारचालकाकडे एका बंद लिफाफ्यात चिठ्ठी दिली. व्यावसायिक अपयशामुळे आत्महत्येचा विचार डोक्‍यात असल्याचे त्यांनी चिठ्ठीत लिहिले आहे. 21 ऑक्‍टोबरपासून ते बेपत्ता झाल्याची खबर मिळताच त्यांना शोधण्यासाठी पोलिस कसोशीने प्रयत्न करीत आहेत.

मास्कविना फिरणाऱ्यांनो, आता चौपट दंड होणार; दिल्लीची कोरोनाची स्थिती गंभीर!

पाषाणकर यांचा शिवाजीनगर पोलिस तसेच गुन्हे शाखेच्या पथकाकडून शोध घेण्यात येत आहे. त्यांचा शोध घेत असताना एक महत्त्वाचा दुवा पोलिसांना 8 नोव्हेंबर रोजी मिळाला होता. पाषाणकर बेपत्ता झाल्याच्या 18 दिवसांनंतर आता एक आशेचा किरण दिसून आला होता. पाषाणकर हे कोल्हापूरमधील एका रेस्टॉरंटच्या बाहेर सीसीटीव्हीत दिसून आले होते. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचे एक पथक कोल्हापूरला रवाना केले होते. मात्र त्यांना ते मिळून आले नाहीत. त्यानंतर पोलिसांनी सहा पथके केली असून कोकणातही त्यांचा शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलेले नाही.

सिंहगड, खडकवासला चौपाटी कधी सुरू होणार?​

पोलिस आयुक्त स्वतः तपासावर लक्ष ठेवून 
वडील बेपत्ता झाल्यानंतर पाषाणकर यांचा मुलगा कपिल यांनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली होती. कपिल यांनी त्यांच्याकडे तक्रार अर्ज दिला आहे. तक्रार अर्जात कपिल यांनी काहीजणांवर संशय व्यक्त केला आहे. तुमच्या वडिलांचा शोध सुरू असून आपण स्वतः: तपासावर लक्ष ठेवून आहोत, असे पोलिस आयुक्तांनी सांगितल्याचे कपिल पाषाणकर यांनी स्पष्ट केले होते.

लग्न करताय का? मग ही बातमी नक्की वाचाच!​

तो राजकीय व्यक्ती कोण?
शहरातील एका बड्या राजकीय नेत्याने वडिलांचे अपहरण केले असल्याचा संशय कपिल पाषाणकर यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी या संदर्भात पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेत तक्रार देखील दिली आहे. कपिल यांनी संशयित राजकीय व्यक्तीचे नाव पोलिसांना काही दिवसांपूर्वीच सांगितले होते. मात्र पोलिसांनी संबंधित राजकीय व्यक्ती मागील तीन दिवसांपासून मंत्रालयात बसून आहे? यामुळे त्याची चौकशी करत आली नसल्याचे कपिल यांना सांगितले. मात्र कपिल यांनी लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी संबंधित राजकीय व्यक्तीने नाव सांगण्यास मात्र नकार दिला आहे. तर दुसरीकडे पोलिसांनीही यासंदर्भात गुन्हा दाखल झाल्याशिवाय कोणतीच माहिती देता येणार नसल्याचे सांगितले.

मी यापूर्वीच काही संशयित लोकांची नावे पोलिसांना दिले होते. त्यानुसार तपासासाठी पोलिसांना मदत होईल, अशी माहिती देण्यासाठी पोलिस आयुक्तांची भेट घेतली. तसेच याबाबत तक्रार दिली आहे. पोलिस त्या अनुषंगाने तपास करीत आहेत.
- कपिल पाषाणकर, गौतम पाषाणकर यांचा मुलगा

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)