मान्सूनचा प्रवास; वाचा कोठे कोसळणार सरी!

monsoon update marathi 2020 medium rainfall possible
monsoon update marathi 2020 medium rainfall possible

पुणे : राज्यात येत्या तीन दिवस म्हणजेच मंगळवार (ता. 23) पर्यंत विदर्भासह कोकण-गोव्यात जोरदार पाऊस तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गेल्या 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भातील तुरळक भागांमध्ये पावसाची नोंद झाली. तर कोकण-गोव्यातील काही भागांमध्ये मध्यम तर उर्वरित भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या चार दिवसांपर्यंत मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हलक्या सरी आणि त्यांनतर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सोमवारपासून ते बुधवारपर्यंत मराठवाड्यातील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावेल. निसर्ग चक्रीवादळ आणि त्यानंतर आगेकूच केलेल्या मान्सूननं गेल्या दोन आठवड्यांत चांगली कामगिरी केली होती. पण, आता मान्सूनचे ढग बेपत्ता झाले आहेत.

पुण्यात हलक्या सरींची शक्यता
पुणे शहर आणि परिसरात दोन दिवस विजांच्या कडकडाटासह हलक्या सरींची शक्यता असून 2.5 ते 15.5 मिलिमीटर इतका पाऊस पडू शकतो. तसेच गुरुवारपासून (ता. 25) पुढील दोन ते तीन दिवस शहर आणि परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे हवामानशास्त्रज्ञ अनुपम काशयपी यांनी दिली.

पावसानं मारली दडी
विदर्भात पावसानं दडी मारलीय. गेल्या दोन आठवड्यांत विदर्भात पावसानं चांगली हजेरी लावली होती. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण होतं. पेरण्याही झाल्या होत्या. पण, पावसानं ओढ दिल्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. उत्तर महाराष्ट्रातही पावसानं ओढ दिलीय. काही ठिकाणी 50 टक्के पेरण्या झाल्या आहेत. पण, पावसाने ओढ दिल्यामुळं शेतकरी पिक पद्धतीत बदल करत असल्याचं दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com