भारतीयांचे 3 महिन्यांत जगाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त ऑनलाइन ट्रांन्झॅक्‍शन

भारतीयांचे 3 महिन्यांत जगाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त ऑनलाइन ट्रांन्झॅक्‍शन

पुणे ः लॉकडाउननंतर जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत भारतीयांनी पैशांच्या देवाणघेवाणीसाठी चक्क जगाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त ऑनलाइन ट्रान्झॅक्‍शन केले आहे. मोबाईलवरील ऍपद्वारे 5.77 अब्ज, नेट बॅंकिंगद्वारे 0.84 अब्ज, युपीआयद्वारे 1.8 अब्ज ऑनलाइन पेमेंट करण्यात आले आहे. तिमाहीतील या ऑनलाइन ट्रान्झॅक्‍शनची बेरीज 8.41 अब्ज होत असून, ही जगाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.

लॉकडाउनच्या आधीच भारतीयांनी ऑनलाइन ट्रांझॅक्‍शनमध्ये वाढ केली होती. लॉकडाउनमध्ये त्याची गरज अधिक वाढली आणि अनलॉक सुरू होताच भारतीयांनी मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन ट्रांझॅक्‍शनला बूस्टर डोस दिला आहे. ऑनलाइन पेमेंटमध्ये सुरक्षितता वाढावी म्हणून रिजर्व बॅंकेने जूनमध्ये "देयक पायाभूत सुविधा विकास निधी' (पीआयडीएफ) ची स्थापना केली आहे. पाच अब्ज रुपयांचा निधीमुळे ऑनलाइन पेमंटसंबंधीच्या पायाभूत सुविधांचा विकास तर होईल, त्याचबरोबर विश्‍वासार्हताही वाढेल, असे मत अहवाल सादर करणाऱ्या वर्ल्ड लाइन संस्थेचे सुनिल रोंगला यांनी व्यक्त केले आहे. 

तिसऱ्या तिमाहीचा आढावा... 
1) मोबाईल ऍपद्वारे पेमेंट ः 
- दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत या तिमाहीत 37 टक्‍क्‍यांनी वाढ 
- 5.77 अब्ज मोबाईल ट्रांझॅक्‍शनपैकी 91 टक्के ट्रांझॅक्‍शन दोन वेगवेगळ्या बॅंकेच्या ग्राहकांमध्ये झाले आहे. 
- ऍपद्वारे साधारणतः 20.08 ट्रिलीयन रकमेची देवाणघेवाण झाली, हे मूल्य 2 ऱ्या तिमाहीच्या तुलनेत 38 टक्‍क्‍यांनी वाढले 
- छोट्या रकमेच्या ट्रांझॅक्‍शनसाठी मोबाईल ऍपचा वापर 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

2) नेट बॅंकिंग 
- दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत या तिमाहीत 35 टक्‍क्‍यांनी वाढ 
- 79 टक्के ट्रांझॅक्‍शन दोन वेगवेगळ्या बॅंकेच्या ग्राहकांमध्ये झाले आहे. 
- ऍपद्वारे साधारणतः 96.93 ट्रिलीयन रुपयांची देवाणघेवाण झाली, हे मूल्य दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत 23.52 टक्‍क्‍यांनी वाढले 
- मोठ्या रकमेच्या ट्रांझॅक्‍शनसाठी वापर 
 

3) युनिफाईड पेमेंट इंटरफेस (युपीआय) ः 
- दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत 82 टक्‍क्‍यांनी वाढ 
- साधारण 3 ट्रिलीयन रुपयांची देवाणघेवाण 
- युपीआयमध्ये तिसऱ्या तिमाहीत 19 बॅंकेने सहभाग घेतला असून, युपीआयचे मोबाईल ऍप्लिकेशन असलेल्या "भीम'मध्ये बॅंकांची संख्या 174 वर पोचली आहे. 

ऑनलाइन पेमेंटमध्ये बॅंकांचा सहभाग (टक्के) ः 
1) आरबीएल ः 26 
2) एचडीएफसी ः 17 
3) एसबीआय ः 14 
4) ऍक्‍सिस ः 10 
5) आयसीआयसीआय ः 9 
6) इतर बॅंक ः 24 

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com