10 th SSC : चला, एक पेपर संपला बाबा! ;' दहावीतील विद्यार्थ्यांच्या भावना,परीक्षा केंद्रावर औक्षण करत शुभेच्छा

वर्षभर केलेला अभ्यास, मोठ्यांकडून येणाऱ्या शेकडो सूचना आणि सल्ल्यांचा केलेला स्वीकार, अखेरच्या टप्प्यात वेगाने केलेला प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव आणि परीक्षा केंद्रात प्रवेश करेपर्यंत केलेली अभ्यासाची उजळणी यानंतर राज्यातील १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी शुक्रवारी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा पहिला पेपर दिला.
10 th SSC
10 th SSC sakal

पुणे : वर्षभर केलेला अभ्यास, मोठ्यांकडून येणाऱ्या शेकडो सूचना आणि सल्ल्यांचा केलेला स्वीकार, अखेरच्या टप्प्यात वेगाने केलेला प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव आणि परीक्षा केंद्रात प्रवेश करेपर्यंत केलेली अभ्यासाची उजळणी यानंतर राज्यातील १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी शुक्रवारी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा पहिला पेपर दिला. लाखो विद्यार्थ्यांनी ‘मराठी’चा (प्रथम भाषा) पहिला पेपर शुक्रवारी दिला. अनेक परीक्षा केंद्रावर औक्षण करत विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. पेपर लिहून बाहेर आल्यानंतर ‘चला, एक पेपर संपला बाबा’ म्हणत मुलांनी सुस्कारा सोडला.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च-२०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला शुक्रवारपासून सुरवात झाली. राज्यातील १६ लाख नऊ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. एक ते २६ मार्च या कालावधीत ही परीक्षा होणार आहे. परीक्षेच्या नियोजित वेळेअगोदर अर्धा तास विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर हजर राहावे, अशी सूचना राज्य मंडळाने माध्यमिक शाळांमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोचवली होती. त्यामुळे सकाळच्या सत्रात सकाळी अकरा वाजता पेपर सुरू होणार होता, परंतु काळजीपोटी विद्यार्थी सकाळी साडे नऊच्या सुमारास परीक्षा केंद्राबाहेर जमले होते. यातील बहुतेक विद्यार्थी पालकांसमवेत परीक्षा केंद्रापर्यंत पोचले होते.

10 th SSC
10 th Board Exam : केसनंद मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत बस व रिक्षा ; प्रमोद हरगुडे मित्र परिवाराचा उपक्रम.

औक्षण करत शुभेच्छा

‘यंदा पाल्याची दहावीची परीक्षा’, म्हणून पालक कामातून अधिकृत रजा काढून परीक्षा केंद्रावर आले होते. परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र असणाऱ्या माध्यमिक शाळांनी औक्षण करत शुभेच्छा दिल्या. विमलाबाई गरवारे प्रशालेत औक्षण करून परीक्षार्थींचे स्वागत करण्यात आले, तर रेणुका स्वरूप प्रशालेतही विद्यार्थिनींचे औक्षण करून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. परीक्षेसाठी पेपरच्या नियोजित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटे वाढवून दिली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी जादाची दहा मिनिटे मिळत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com