परीक्षेचे राजकारण करू नका, निर्णय घ्या

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 May 2020

राज्यात विद्यापीठ व महाविद्यालयात अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा न देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (यूजीसी) पत्र पाठवून मार्गदर्शन करावे अशी मागणी सरकारने केली आहे. यूजीसी'ने अद्याप त्यावर प्रतिक्रिया दिलेली नसली तरी, सरकारच्याा भूमिकेवरून राज्याच दोन गट पडले आहेत. 

पुणे : ''राज्यातील विद्यापीठांमध्ये अंतीम वर्षाच्या परीक्षेवरून राजकारण न करता विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून निर्णय घ्या'', अशी मागणी महाराष्ट्र स्टुडंट युनियनने (मासू) केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात विद्यापीठ व महाविद्यालयात अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा न देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (यूजीसी) पत्र पाठवून मार्गदर्शन करावे अशी मागणी सरकारने केली आहे. यूजीसी'ने अद्याप त्यावर प्रतिक्रिया दिलेली नसली तरी, सरकारच्याा भूमिकेवरून राज्याच दोन गट पडले आहेत. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शिक्षणसंस्था चालक, शिक्षण तज्ज्ञ यांच्यासह अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने लेखी परीक्षा रद्द करण्यास विरोध केला आहे. योग्य नियोजन करून परिक्षा द्याव्यात अशी मागणी केली आहे. तर, युवासेना, मासू यासह इतर संघटनांनी परीक्षा होऊ नये, तसेच यूजीसी'च्या नियमांचे उल्लंघन होणार नाही असे सांगितले आहे. त्यातच राज्यप भगतसिंग कोश्यारी यांनी ट्विटरद्वारे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना परीक्षा देण्यासाठी नियोजन करावे, परीक्षा रद्द करणे योग्य नाही असे निर्देश दिले आहेत. 
त्यामुळे राज्यात राजकारण सुरू झाले आहे. 

बारामतीतील माळेगाव कारखान्याच्या टाकीत आठ जण गुदमरले

मासूचे अध्यक्ष अॅड.सिद्धार्थ इंगळे म्हणाले, "राज्यात परीक्षा द्यावी असे वातावरण नाही, त्यामुळे यूजीसीच्या नियमानुसार अंतर्गत मुल्यमापन करून पदवी देता येते. मात्र महाराष्ट्रात सत्ताधारी व विरोधक यांच्यात राजकारण सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आणि मानसिकतेचा विचार करून या गंभीर प्रश्नावर राजकारण करणे टाळावे.

पुण्यातील जनता वसाहतीत कोरोना रोवतोय पाय: गेल्या 9 दिवसात...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The MSU has demanded that the decision should be taken about the final year examination in the state universities