Vidhan Sabha 2019 : पुण्याच्या महापौरांनी भरला आमदारकीसाठी उमेदवारी अर्ज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

कसबा विधानसभा मतदारसंघातून टिळक यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून समाजातील विविध घटकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

पुणे : भारतीय जनता पार्टीच्या कसबा विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार मुक्ता शैलेश टिळक यांनी गुरुवारी (ता.3) उमेदवारी अर्ज दाखल केला.

कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे टिळक यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून समाजातील विविध घटकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्याचीच प्रचिती आज अर्ज भरण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीवेळी आली. पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री कसबा गणपतीच्या दर्शनानंतर या रॅलीस प्रारंभ झाला.

तत्पूर्वी, टिळक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले. या रॅलीमध्ये खासदार गिरीश बापट, नगरसेवक हेमंत रासने, धीरज घाटे, अजय खेडेकर, आरती कोंढरे, राजेश येनपुरे, अर्चना पाटील, माजी नगरसेवक सुहास कुलकर्णी यांच्यासह शिवसेना, आरपीआयचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- Vidhan Sabha 2019 : शिवाजीनगर मतदार संघातून सिद्धार्थ शिरोळेंनी भरला उमेदवारी अर्ज

- पुणेकरांनो, घरी लवकर परता कारण...

- Vidhan Sabha 2019 : पुण्यात पीएमपीने प्रवास करत भरला उमेदवारी अर्ज


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mukta Tilak filed her nomination from Kasaba Constituency for Maharashtra Vidhansabha 2019