बारामती शहरातील फेरीवाले होणार आत्मनिर्भर...अशी आहे योजना

baramati nagarpalika
baramati nagarpalika

बारामती (पुणे) : हातावरचे पोट असलेल्या सूक्ष्म व्यावसायिकांना आर्थिक बळ देण्यासाठी नगरपालिका प्रयत्न करणार आहे. केंद्राच्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेच्या अंमलबजावणीस बारामतीत प्रारंभ केल्याची माहिती मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी दिली. 

पथविक्रेते व फेरीवाले यांचा व्यवसाय सुरळीत सुरु राहण्यासाठी बँकामार्फत भांडवली पतपुरवठा व्हावा, या साठी नगरपालिकेने ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. फेरीवाला, रस्त्यावरील वस्तू विक्रेता यांना सूक्ष्म पतपुरवठा करण्यासाठी पात्र लाभाधारकांना बँकेमार्फत प्रतिलाभार्थी दहा हजार रुपये इतके कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संबधित लाभधारकांनी नियमित कर्जाची फेड केल्यास तिमाही व्याज अनुदानाचा लाभ मिळणार आहे. बँक आणि लाभधारक यांच्यात बारामती नगर परिषद समन्वयाची भूमिका साधणार आहे. 

असे आहे पतधोरण..
 - पथविक्रेत्यांना एक वर्षाच्‍या परतफेड मुदतीसह रक्‍कम रूपये दहा हजारपर्यंतचे बँकेमार्फत विनातारण खेळते भांडवल कर्ज उपलब्‍ध करून दिले जाईल.
 - सदर कर्जावर आर.बी.आय.च्‍या प्रचलित दराप्रमाणे व्‍याज दर लागू राहिल. तसेच, त्‍याचे दरमहा हप्‍त्‍याने परतफेड केल्‍यास ७ टक्क्यांवरील व्‍याज अनुदानाचा लाभ दिला जाईल.
 - नियमित डिजिटल व्‍यवहार केल्‍यास कॅश-बॅकसाठी पात्र

यांना मिळणार लाभ  
 - बारामती नगरपरिषदेने केलेल्‍या फेरीवाल्‍यांच्‍या सर्वेक्षणात आढळलेले, परंतु त्‍यांना विक्री प्रमाणपत्र अथवा ओळखपत्र दिले गेले नाही, असे पथविक्रेते.
 - 24 मार्च 2020 रोजी व त्‍यापूर्वीचे बारामती शहरामध्‍ये विक्री / व्‍यवसाय करणारे पथविक्रेते.
 - टाळेबंदी (लॉकडाउन) नंतर व्‍यवसाय करणारे पथविक्रेते.

आवश्‍यक कागदपत्रे
 - आधारकार्ड व आधारकार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर
 - मतदान ओळखपत्र
 - वाहन परवाना
 - रेशनकार्ड
 - बँक पासबुक झेरॉक्‍स

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
 - पोर्टल ( http://pmsvanidhi.mohua.gov.in)
 - बारामती नगरपरिषद व शहरातील नागरी सुविधा केंद्र.
 - शुल्‍क- 50 रुपये. 

येथे संपर्क साधा
पहिला मजला, “शहर अभियान व्‍यवस्‍थापन कक्ष” दीअंयो- राष्‍ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-NULM) बारामती नगरपरिषद, बारामती. अली मुल्‍ला (88888 49083) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com