पुण्यात 100 जणांच्या टोळक्याची दहशत; तलवार कोयत्याने वाहनांची तोडफोड, एकावर हल्ला

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 31 October 2020

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास नेहरूनगर येथील नटराज हाउसिंग सोसायटी, शौकत मंजिल या इमारती समोरील परिसरात दुचाकीवर आलेल्या १०० जणांच्या टोळक्यांनी रस्त्यावर लावण्यात आलेल्या वाहनांच्या कोयता, तलवार, दगडांनी वाहनांच्या काचा फोडून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले.

पिंपरी : नेहरूनगरमध्ये शुक्रवारी रात्री शंभर जणांच्या टोळक्याने हातात तलवार कोयता व दगडफेक करत परिसरातील दहा ते पंधरा वाहनांच्या काचा फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. या घटनेत एका तरुणावार कोयत्याने वार देखील करण्यात आले असून तो जखमी झाला आहे. या घटनेमुळे नेहरूनगर मध्ये भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास नेहरूनगर येथील नटराज हाउसिंग सोसायटी, शौकत मंजिल या इमारती समोरील परिसरात दुचाकीवर आलेल्या १०० जणांच्या टोळक्यांनी रस्त्यावर लावण्यात आलेल्या वाहनांच्या कोयता, तलवार, दगडांनी वाहनांच्या काचा फोडून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. यावेळी येथे एका कार्यालयासमोर उभ्या असलेल्या तरुणावर कोयत्याने वार देखील करण्यात आले आहेत. या घटनेत तरुण जखमी झाला आहे.

'पदवीधर'साठी भाजपचे महानोंदणी अभियान; अडीच हजार कार्यकर्ते उतरणार रस्त्यावर​

अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यानंतर टोळक्यांनी नेहरूनगर येथील नेहरू टॉवर, वाघिरे टॉवर, वाघेरे वाडा परिसरातील रस्त्यावर लावण्यात आलेल्या पाच ते सहा वाहनांच्या काचा फोडून दहशत माजवली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या काचा फोडल्याने नागरिकांनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रात्री उशिरा पर्यंत परिसरामध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती कळताच तातडीने पोलीस उपनिरीक्षक सतेश जाधव, शिरसाठ, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा नेहरूनगर मध्ये दाखल झाला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मध्यरात्री पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी देखील नेहरूनगर मध्ये घडलेल्या घटनेच्या ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली.

पुण्यात घडली किळसवाणी घटना; अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार​

ईद ए मिलाद व कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर या भागात गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी पथ संचलन करून परिसरामध्ये गस्त घातली होती. पथसंचलनाच्या दुसऱ्याच दिवशी टोळक्यांनी परिसरात दगडफेक, वाहनांची तोडफोड करून परिसरामध्ये दहशत माजवली. या घटनेचे थेट पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दखल घेत आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

काय म्हणावं या जोडप्याला; कुलूप तोडून बळकावलं बंद रो हाऊस!​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: murderous attack on one and stone pelting vandalism of vehicle with sword and sharp Weapon In Nehru Nagar