esakal | पुण्यातील या गावात होणार लाखो वर्षांपूर्वीच्या वस्तूंचे जतन  
sakal

बोलून बातमी शोधा

bori

डेक्कन कॉलेजच्या वतीने बोरी गावामध्ये येत्या दोन वर्षाच्या काळात शास्त्रीयदृष्ट्या सर्वेक्षण, उत्खनन व संवर्धन याचे कार्य सुरू होणार आहे. डेक्कन कॉलेजचे तज्ज्ञ यामध्ये सहभागी होणार असून, अवशेषांचे सर्वेक्षण, उत्खनन, ऐतिहासिक दस्तावेजांचे संकलन करून बोरीचा इतिहास जगापुढे मांडला जाणार आहे. 

पुण्यातील या गावात होणार लाखो वर्षांपूर्वीच्या वस्तूंचे जतन  

sakal_logo
By
सिद्धार्थ कसबे

पिंपळवंडी (पुणे) : जुन्नर तालुक्यातील बोरी गावातील प्रागैतिहासिक काळातील स्थळे, ऐतिहासिक वास्तू यांचे शास्त्रीयदृष्ट्या संवर्धन व जतन होण्यासाठी व वस्तुसंग्रहालय करण्याच्या दृष्टीने डेक्कन कॉलेज संशोधन संस्था आणि बोरी बुद्रुक ग्रामपंचायत यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला आहे. पुढील दोन वर्षांसाठी हा करार झाल्याची माहिती सरपंच पुष्पा कोरडे यांनी दिली.

अमोल कोल्हे यांच्या पंचसूत्रीचे पालन करा...कोरोनाला दूर रोखा....

डेक्कन कॉलेजच्या वतीने बोरी गावामध्ये येत्या दोन वर्षाच्या काळात शास्त्रीयदृष्ट्या सर्वेक्षण, उत्खनन व संवर्धन याचे कार्य सुरू होणार आहे. डेक्कन कॉलेजचे तज्ज्ञ यामध्ये सहभागी होणार असून, अवशेषांचे सर्वेक्षण, उत्खनन, ऐतिहासिक दस्तावेजांचे संकलन करून बोरीचा इतिहास जगापुढे मांडला जाणार आहे. बोरी बुद्रुक ग्रामपंचायतीने  तयार केलेल्या पर्यटन विकास आराखड्यानुसार कृषी पर्यटन, निसर्ग पर्यटन या व्यतिरिक्त ऐतिहासिक पर्यटन याबाबींवर  काम होणार असून, गावाच्या पर्यटन विकासासोबत संस्कृती व वारसा ठेव्यांचे जतन लोकसहभागातून वाढीस लागणार आहे.

दौंडमधील या कुटुंबातील सहा जणांचे कोरोनाचे रिपोर्ट...

बोरी येथे आदिमानवाच्या कालखंडातील हत्यारांपासून ते पेशवेकालीन वाड्यांपर्यंतचे अवशेष  मिळतात. सन १९८५ ते २००० या काळात पुरातत्व विभाग, डेक्कन कॉलेज यांच्यामार्फत कुकडी नदीच्या व सभोवतालच्या भागात उत्खनन झाले होते. यामध्ये कुकडी नदीच्या पात्रात लाखो वर्षांपूर्वी प्रागैतेहासिक काळात झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकातील राखेचे पुरावशेष पुरतत्वीय संशोधनातून आढळून आले होते. त्यानंतर नदीच्या पात्रात व नदीच्या बाजूला केलेल्या उत्खननात प्रागैतेहासिक काळात मानवाने उपयोगात आणलेली हत्यारे व प्राण्यांच्या अवशेषांचे पुरावशेष (२ मी. लांबीचा हत्तीचा दात) ज्वालामुखीय अवशेषाखाली प्राप्त झाले आहेत.

जुन्नरमधील कोरोनाबाधितांसाठी एक हजार बेडची व्यवस्था

जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे व माजी जिल्हा परिषद सदस्य शारदा शिंदे यांच्या मार्गदर्शनखाली बोरी बुद्रुक ग्रामपंचायतीने गावाचा पर्यटन विकास आराखडा तयार करून आमदार अतुल बेनके यांच्याद्वारे महाराष्ट्र सरकारकडे सादर केला आहे. सदर सामंजस्य कराराच्या वेळी डेक्कन कॉलेजचे प्रभारी कुलगुरु प्रसाद जोशी, पुरातत्व विभाग प्रमुख प्रो. जोगळेकर, समन्वयक डॉ. सचिन जोशी, बोरी बुद्रुकच्या सरपंच पुष्पा कोरडे, बोरी बुद्रुक पर्यटन व सांस्कृतिक वारसा संवर्धन समितीचे रंजन जाधव, शंकर शिवराम जाधव, अर्जुन जाधव, अमोल कोरडे, इकबाल जमादार शेख, संदीप जाधव आदी उपस्थित होते.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Edited by : Nilesh Shende

loading image