esakal | नसरापूर बाजारपेठ आठ दिवस राहणार पुर्ण बंद

बोलून बातमी शोधा

nasrapur
नसरापूर बाजारपेठ आठ दिवस राहणार पूर्ण बंद
sakal_logo
By
किरण भदे

नसरापूर : नसरापूर (ता.भोर )मध्ये सातत्याने कोरोना रुग्णांची वाढ होत असल्याने भोरच्या प्रांत अधिकारयांनी नसरापूर गावा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. नसरापूरमधील रुग्णालय व औषधांची दुकाने सोडता सर्व बाजारपेठ 1 मे पर्यंत पूर्ण बंद राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. भोर तालुक्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या व त्यावर करावयाची उपाययोजना यासाठी भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांनी तातडीची बैठक घेऊन तालुक्यातील कोरोनाची स्थितीचा आढावा घेतला.

हाँटस्पाँट झालेल्या नसरापूर (रुग्ण 23),सारोळा (रुग्ण 11), संगमनेर (रुग्ण 21), वरवे (रुग्ण 15), वेळु (रुग्ण 11), शिंदेवाडी (रुग्ण 17), किकवी (रुग्ण 10), कापुरव्होळ (रुग्ण 11), हातवे(रुग्ण 37), केळवडे (रुग्ण12) ही गावे प्रतिबंधीतक्षेत्र म्हणुन जाहीर करण्यात आली आहेत.

हेही वाचा: पाचवी ते आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आणखी लांबली जाण्याची चिन्हे

नसरापूर मध्ये बाजारपेठ असल्याने या ठिकाणी मोठ्या गर्दीच्या पार्श्वभुमीवर या ठिकाणी विशेष कडक अमंलबजावणी करण्यात येणार आहे गावामध्ये आठ दिवस कोणीही बाहेर येणार नाही व बाहेरचे कोणी गावात जाणार नाही. सर्व दुकाने बंद ठेवून मुख्य रस्त्यावर चेकपोस्ट उभारणार आहेत. त्या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक, महसुल कर्मचारी, पोलिस कर्मचारी व पोलिस पाटील उपस्थित राहून विनाकारण फिरणारयांवर कारवाई करणार आहेत. अत्यावश्यक कामा निमित्त आलेल्यांची नोंद घेणार आहेत.

दरम्यान आरोग्य विभागाच्यावतीने दररोज किमान 50 घरांचे सर्व्हेक्षण त्याचा अहवाल वरिष्ठ अधिकारयांकडे देण्याच्या सुचना प्रांताधिकारी राजेंद्र जाधव व तहसिदार अजित पाटील यांनी दिल्या आहेत. या निर्णयांची काटेकोर अंमलबजावणीसाठी राजगड पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदिप घोरपडे यांनी पोलिस ठाण्यात ग्रामपंचायत सरपंच सदस्य,महसुल कर्मचारी व व्यापारी संघटनेचे प्रमुख यांची बैठक सायंकाळी घेतली यावेळी भोरचे उपसभापती लहुनाना शेलार, नसरापूरचे उपसरपंच गणेश दळवी सदस्य नामदेव चव्हाण, संदिप कदम, इरफान मुलाणी, तलाठी जे डी बरकडे व्यापारी संघटनेचे कार्याध्यक्ष प्रदिप राशिनकर, ज्ञानेश्वर झोरे,अनिल शेटे, ऋषकेश खेडकर, आदी उपस्थित होते

हेही वाचा: पुण्यात रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन काळाबाजारात विक्री करणाऱ्या महिलेसह चौघांना अटक

यावेळी पोलिस निरीक्षक घोरपडे यांनी भोर प्रांताधिकारी यांच्या आदेशाने नसरापूर येथे कंटेनमेंट झोन ची कडक अमंलबजावणी करण्यात येणार आहे. गावामध्ये कोणीही बाहेर फिरु नये, रुग्णालय व औषध दुकान सोडता कोणीही दुकाने उघडू नये, तसे दिसल्यास दंडात्मक कारवाईला तोंड द्यावे लागेल. मुख्य रस्त्यावर अत्यावश्यक वाहतूकीलाच परवानगी दिली जाईल तसेच येथील प्राथमिक शाळेत चालू असलेले लसीकरण नियोजित वेळे प्रमाणे चालू राहील. मात्र त्यासाठी ज्यांना लसीकरण करावयाचे आहे त्यांनाच बाहेर सोडण्यात येईल. ''कोरोनाची साखळी तुटण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी प्रशासनास सहकार्य करावे'' असे अवाहन त्यांनी यावेळी केले.नसरापूर बिटचे हवालदार प्रमोद भोसले,कुललिक माने,गोपनिय विभागाचे भागीरथ घुले यांनी यावेळी प्रतिबंधीत झोन मध्ये पालन करावयाच्या नियमांची माहीती दिली.

हेही वाचा: बॅंकेत भरणा करण्यासाठी दिलेली 12 लाखाची रोकड घेऊन कर्मचाऱ्याने ठोकली धूम