esakal | कऱ्हा नदीवरील नाझरे धरण ओव्हर फ्लो; 'या' गावांचा पाणीप्रश्न सुटला
sakal

बोलून बातमी शोधा

naz.jpg

जेजुरी जवळील नाझरे धरण (मल्हार सागर) काल रात्री नऊ वाजता पुर्ण क्षमतेने भरून वाहू लागले.

कऱ्हा नदीवरील नाझरे धरण ओव्हर फ्लो; 'या' गावांचा पाणीप्रश्न सुटला

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जेजुरी : जेजुरी जवळील नाझरे धरण (मल्हार सागर) काल रात्री नऊ वाजता पुर्ण क्षमतेने भरून वाहू लागले. सकाळी १९०० क्युसेक वेगाने पाणी धरणातून क-हा नदीत जात आहे. धरण भरल्याने जेजुरीसह सुमारे पन्नास गावांचा पिण्याच्या पाण्याचा वर्षभऱाचा प्रश्न सुटला आहे.

महत्त्वाची बातमी : मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेन कधी होणार सुरू? बड्या मंत्र्यानं दिलं 'हे' उत्तर

क-हा नदीवर जेजुरी जवळ नाझरे धरण (मल्हार सागर) हा मध्यम प्रकल्प आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता ७८८ दशलक्ष घनफुट एवढी आहे. पुरंदर व बारामती तालुक्यातील सुमारे पन्नास गावांना या धरणावरून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. जेजुरी शहरासह जेजुरी औद्योगिक वसाहत, माळशिरस प्रादेशिक योजना, नाझरे प्रादेशिक योजना, कोळविहिरे प्रादेशिक योजना, मोरगाव प्रादेशिक योजना आदी योजनेतून सुमारे पन्नास गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होता.

या शिवाय कालव्याव्दारेही परिसरातील शेतीला आवर्तने दिली जातात. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस झाल्याने क-हा नदीला वेगाने पाणी वाहत आहे. त्यामुळे जेजुरी जवळील ७८८ दशलक्ष घनफुट क्षमता असलेले नाझरे धरण रात्री पुर्ण क्षमतेने भरून वाहू लागले. रात्री ९ नंतर स्वयंचलित दरवाजे उघडले.सुमारे २६ स्वयंचलित दरवाजे आहेत. यंदा धरण लवकर भरल्याने परिसरातील शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान जेजुरी परिसरातील नागरीक धरणाचे पाणी पाहण्यासाठी सांडव्याच्या ठिकाणी गर्दी करित आहेत.

हेही वाचा : सुशांतची एक्स गर्लफ्रेंडवर गंभीर आरोप, अंकितानं दिलं 'असं' सडेतोड प्रतिउत्तर

(Edited by : Sagar Diliprao Shelar)