'सत्तेची नशा डोक्यात जाऊ देऊ नका'; अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 January 2020

नीरा डावा कालव्याच्या पाण्याबाबत अधिक बोलत नाही. मात्र, शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे कारण नाही, अशी ग्वाही पवार यांनी दिली.

बारामती : ''राज्याची अर्थव्यवस्था कमालीच्या अडचणीत आहे, विकास दर घटला आहे, रुपयाचे अवमूल्यन होत आहे, महागाई वाढत आहे, अशा स्थितीत काम करताना जिद्द व चिकाटी ठेवून काम कराव लागणार आहे. काम थोड अवघड असले तरी तिन्ही पक्ष लोकांच्या अपेक्षा पूर्ण करतील,'' असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अजित पवार यांचा बारामतीत आज नागरी सत्कार करण्यात आला, त्याला उत्तर देताना ते बोलत होते. सुनेत्रा पवार, अमोल मिटकरी, विश्वास देवकाते यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, नियमित कर्ज परतफेड करणारे व दोन लाखांहून अधिक कर्ज घेतलेल्यांच्याही अपेक्षा आहेत, या बाबत मुख्यमंत्र्यासह सर्वांनीच लक्ष घातले आहे, या बाबत आम्ही लक्ष घातले आहे. जीएसटीमध्ये होणारी घट, रुपयाचे होणारे अवमूल्यन, विकासदरात झालेली घट यामुळे आव्हाने मोठी आहेत, मात्र महाविकासआघाडीचे सरकार लोकांच्याअपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. 

- पुणे : सारथीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना थकीत विद्यावेतन द्या; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

बारामती, पुणे व मुंबईसह राज्यात पोलिसांना 500 स्क्वेअर फूटांची घरे देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, त्या दृष्टीने काम सुरु झाले आहे. राज्यातील कोणत्याही माध्यमांच्या शाळेत पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय अनिवार्य करण्याबाबत लवकरच शासन निर्णय घेईल. सर्वांचा याला पाठिंबा आहे. महाराष्ट्रात राहता मग मातृभाषा यायलाच हवी. 

पुरंदरच्या विमानतळाबाबत विरोध लक्षात घेत, योग्य मोबदला देऊन, चर्चा करुन विश्वासात घेऊन हे काम मार्गी लावायचे आहे. बारामती व पुण्यापासून हा विमानतळ 50 कि.मी. वर येईल, त्याचा पश्चिम महाराष्ट्राला फायदा होईल. बारामती-फलटण रेल्वे भूसंपादन व पालखी मार्गाचे काम वेगाने मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे.

- पुणे : महायुतीने केलेल्या नियुक्त्या अजित पवारांकडून रद्द

बारामतीनजीक कॅन्सर हॉस्पिटलसाठी 25 एकर जागा शोधतो आहोत. मेट्रोच्या कामाला निधी उपलब्ध करुन द्यायचा आहे, प्रश्न आ वासून उभे आहेत, पण त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न निश्चित करु. नीरा डावा कालव्याच्या पाण्याबाबत अधिक बोलत नाही. मात्र, शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे कारण नाही, अशी ग्वाही पवार यांनी दिली. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 2 कोटी 54 लाखांचा निधी या वेळी प्रदान करण्यात आला. 

- Pune : 'पॅनकार्ड क्लब' घटनेची सीबीआयमार्फत चौकशी करा; गुंतवणूकदारांची मागणी

नशा डोक्यात जाऊ देऊ नका...

माझ्या नावाचा वापर करुन पोलिसांना किंवा इतर कोणालाही दमदाटी करु नका, सत्तेची नशा डोक्यात जाऊ देऊ नका. अशा शब्दात अजित पवारांनी कार्यकर्त्यांना आदेश दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader and Deputy CM Ajit Pawar was honored by the citizens of Baramati