Big Breaking: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे पुण्यात निधन

टीम ई-सकाळ
Saturday, 28 November 2020

शनिवारी (ता.२८) सकाळी पंढरपूरमधील सरकोली या गावी भालकेंवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे सदस्य आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी (ता.२७) मध्यरात्री निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. 

पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याची रंगीत तालीम पूर्ण; दिल्लीहून विशेष सुरक्षा पथके दाखल

आमदार भालके यांना ३० ऑक्टोबरला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर कोरोनातून बरे होऊन घरी आल्यानंतर काही दिवसांनी त्यांची तब्येत पुन्हा बिघडली. शुक्रवारी त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक नेते-पदाधिकारी यांनी रुबी हॉलला भेट दिली तर काहींनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती.

BHR पतसंस्था घोटाळ्याप्रकरणी संचालकांच्या घरी छापे; रात्री उशिरापर्यंत चौकशी​

मात्र, शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भालके यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन विवाहित मुली असा परिवार आहे. शनिवारी (ता.२८) सकाळी पंढरपूरमधील सरकोली या गावी भालकेंवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MLA Bharat Bhalke passed away at 60 in Pune