Loksabha 2019 : जोशींच्या पाठिशी राष्ट्रवादीची पूर्ण ताकद: वंदना चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी हे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. शहरातील वेगवेगळ्या घटकांशी त्यांचा संबंध असून, त्यांची उमेदवारी ही निष्ठावान कार्यकर्त्याला मिळालेला न्याय आहे. त्यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा धर्म पाळेल. राष्ट्रवादीची सर्व ताकद जोशी यांच्यासाठी काम करेल आणि त्यांचा विजय निश्चित होईल.

पुणे : काँग्रेसने पुण्यातून निष्ठावंत कार्यकर्ते मोहन जोशी यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीची सर्व ताकद जोशी यांच्यासाठी काम करेल आणि त्यांचा विजय निश्चित होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी म्हटले आहे.

काँग्रेसने पुणे शहर लोकसभा मतदारसंघासाठी पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आणि माजी आमदार मोहन जोशी यांच्या उमेदवारीची सोमवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास घोषणा केली. गेले आठवडाभर काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळणार, याबद्दल तर्कवितर्क सुरू होते. जोशी यांना 1999 च्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसकडून शहरात उमेदवारी मिळाली होती. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असून, पुण्यात जोशींना राष्ट्रवादीची मदत मिळणार आहे.

वंदना चव्हाण म्हणाल्या, की काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी हे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. शहरातील वेगवेगळ्या घटकांशी त्यांचा संबंध असून, त्यांची उमेदवारी ही निष्ठावान कार्यकर्त्याला मिळालेला न्याय आहे. त्यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा धर्म पाळेल. राष्ट्रवादीची सर्व ताकद जोशी यांच्यासाठी काम करेल आणि त्यांचा विजय निश्चित होईल.

संबंधित बातम्या :
Loksabha 2019 : अखेर मोहन जोशी यांचा 'पंजा'; पुण्यातून उमेदवारी जाहीर
काँग्रेसला खरचं लढायचं आहे तर...!​

Web Title: NCP MP Vandana Chavan talked about Pune Congress candidate Mohan Joshi