अजित पवार म्हणतात, आता वशिला चालणार नाही...

ajit.jpg
ajit.jpg

पुणे : जिल्हा परिषद व पंचायत समितीचे नवे कारभारी निवडताना वशिलेबाजीला अजिबात थारा दिला जाणार नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत संबंधित इच्छुकाच्या गावातून, गणातून आणि गटातून राष्ट्रवादी
कॉंग्रेसच्या उमेदवाराला किती मतदान झाले, याच्याच आधारे नवा पदाधिकारी निवडला जाणार आहे. यासाठी गाव आणि मतदारसंघनिहाय विधानसभेतील कामगिरी तपासून पाहणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता.
14) सर्व इच्छुकांना सांगितले.

विधानसभेतील मताधिक्‍याच्या जोडीलाच गुणवत्तेचाही विचार केला जाणार आहे. यासाठी विधानसभेच्या मताधिक्‍याबरोबरच इच्छुकांनी आपापल्या मतदारसंघात आतापर्यंत केलेली विकासकामे, कामांची पद्धत, दर्जा, शिक्षण आणि
कार्यक्षमता आदी बाबी तपासून पाहिल्या जातील. त्यामुळे इच्छुकांनी वशिल्याच्या निवडीवर अवलंबून राहू नये, असा सल्लाही पवार यांनी यावेळी दिला. त्यामुळे निम्म्याहून अधिक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशन आणि मंत्री मंडळाच्या विस्तार न झाल्याने, झेडपी, पंचायत समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडी दोन आठवडे लांबल्या आहेत. त्यामुळे इच्छुकांना अजूनही पक्षाकडे लेखी अर्ज करण्याची संधी आहे.
त्यानुसार सर्व इच्छुकांनी तसा अर्ज करण्याची सूचनही यावेळी सर्वांना करण्यात आली.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर पदाधिकारी करण्याची मागणी अनेकांनी पक्षाकडे केली आहे. यापैकी काही सदस्यांनी तर, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली आहे. पण लक्षात ठेवा, गुणवत्ता आणि पक्षासाठी केलेल्या
कामाच्या आधारेच नव्या कारभाऱ्यांची नावे निश्‍चित केली जातील, असेही त्यांनी यावेळी बजावून सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com