अंतिम वर्ष परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची पसंती ऑनलाइनलाच!

ब्रिजमोहन पाटील
Tuesday, 15 September 2020

विद्यार्थ्यांना परीक्षेचे माध्यम निवडण्यासाठी सोमवारी (ता.14) रात्री 12 पर्यंत नोंदणीसाठी लिंक खुली ठेवली आहे. तर विद्यापीठ आवारात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 17 सप्टेंबर पर्यंत लिंक खुली आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी 2 लाख 20 हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, त्यामध्ये 1 लाख 85 हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा देण्याची तयारी दाखवली आहे. आणि त्यातही तब्बल 1 लाख 10 हजार विद्यार्थी मोबाईलवरून परीक्षा देणार आहेत.

मराठा क्रांती मोर्चाने विद्यार्थ्यांबाबत राज्य सरकारकडे केल्या 'या' मागण्या; वाचा सविस्तर​

सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाची परीक्षा घेण्याचे आदेश दिल्याने पुणे विद्यापीठाने परीक्षा घेण्याची तयारी सुरू केली आहे.
कमी काळात ही परीक्षा संपविण्यासाठी बहुपर्यायी प्रश्‍न (मल्टिपल च्वाईस क्वेश्‍चन-एमसीक्‍यू) पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन परीक्षेचे पर्याय आहेत, पण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा द्यावी यासाठी विद्यापीठाने प्रयत्न सुरू केले होते, त्यासाठी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी प्राचार्यांची बैठक घेऊन त्याबाबत सूचना केल्या होत्या. विद्यार्थ्यांना परीक्षेचे माध्यम निवडण्यासाठी सोमवारी (ता.14) रात्री 12 पर्यंत नोंदणीसाठी लिंक खुली ठेवली आहे. तर विद्यापीठ आवारात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 17 सप्टेंबर पर्यंत लिंक खुली आहे.

मोठी बातमी : पुणे जिल्ह्यातील सर्व संशयितांची कोरोना चाचणी होणार; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती​

पुणे विद्यापीठाअंतर्गत 2 लाख 48 हजार विद्यार्थी अंतिम वर्षाची परीक्षा देणार आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंत 2 लाख 20 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 1 लाख 85 हजार विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा देण्यासाठी तयार आहेत. यापैकी 1 लाख 10 हजार विद्यार्थ्यांनी मोबाईलवरून परीक्षा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर सुमारे 70 हजार विद्यार्थी लॅपटॉप वापरणार आहेत तर उर्वरित सुमारे 5 हजार जण डेस्कटॉप आणि टॅबलेट या साधनांचा वापर करणार आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिली.

पैसे घेऊन मार्क वाढविणारा अधिकारी पोलिसांच्या ताब्यात; साथीदारांचा शोध सुरू​

35 हजार जणांची ऑफलाईन परीक्षा
स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅबलेट अशी साधणे उपलब्ध नसणे, नेटवर्कचा प्रॉब्लेम यासह अन्य कारणांमुळे सुमारे 35 हजार विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षा देण्याचा पर्याय निवडला आहे. रात्री 12 पर्यंत जे विद्यार्थी कोणत्याही प्रकारचा पर्याय निवडणार नाहीत अशांची देखील ऑफलाइन घ्यावी लागणार. त्यामुळे या आकड्यात वाढ होण्याची शक्‍यता आहे.

एकूण विद्यार्थी - 2 लाख 48 हजार
परीक्षा पर्याय निवडणारे विद्यार्थी - 2 लाख 20 हजार
ऑनलाईन पर्याय - 1 लाख 85 हजार
मोबाईलद्वारे परीक्षा - 1 लाख 10 हजार
लॅपटॉपद्वारे - 70 हजार
ऑफलाइन - 35 हजार

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nearby two lakh students have opted online option for the final exam