

काठमांडू, ता. १३ (पीटीआय)ः ‘‘आमच्या कुटुंबाने निवडणुकीत तुमच्या पक्षाला, म्हणजे ‘घंटी’ या चिन्हाला मतदान केले होते. मग तुम्ही आमचे घर का पाडले? आता आम्ही कुठे राहायचे आणि शिक्षण कसे घ्यायचे?’’ असा प्रश्न नेपाळमधील राधिका महतो या अकरावर्षीय बालिकेने थेट नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांना पत्र लिहून विचारला आहे. तिच्या या प्रश्नामुळे काठमांडूतील भूमिहीन झोपडीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. काठमांडू महापालिकेने राधिकाच्या कुटुंबाचे तात्पुरते घर पाडल्यानंतर तिने हे भावनिक पत्र लिहिले आहे.
‘आमच्याकडे घर भाड्याने घेण्यासाठी पैसे नाहीत. तुम्ही आमची अवस्था अत्यंत दयनीय केली आहे,’ असे तिसरीत शिकणाऱ्या राधिकाने या पत्रात नमूद केले आहे. ‘रातोपाटी’ या न्यूज पोर्टलने बुधवारी या पत्रातील काही भाग प्रसिद्ध केला. तीन आठवड्यांपूर्वीपर्यंत राधिका थापाथळी येथील झोपडपट्टीत राहत होती आणि जवळच असलेल्या गुहेश्वरी बाल शिक्षण माध्यमिक विद्यालयात शिकत होती. मात्र, प्रशासनाने या भागातील शेकडो घरे जमीनदोस्त केली आणि विस्थापित कुटुंबांना काठमांडूपासून ७५ किमी अंतरावर असलेल्या बनेपा नगरपालिकेतील तात्पुरत्या केंद्रात हलवले. यामुळे राधिकाचे शिक्षण अर्ध्यावरच थांबले आहे.
पंधरा हजार झोपडीधारकांना हटविले!
गेल्या दोन आठवड्यांत सरकारने काठमांडूतील १५ हजारांहून अधिक भूमिहीन झोपडीधारकांना हटविले असून सुमारे चार हजार बांधकामे पाडली आहेत. सार्वजनिक जमीन आणि नदीकाठच्या भागातील ही अतिक्रमणे असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, पुनर्वसनाची कोणतीही व्यवस्था न करता ही कारवाई केल्यामुळे मानवाधिकार कार्यकर्ते आणि विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.