
वारजे माळवाडी : "देशात नवीन शैक्षणिक धोरण सुरु आहे. संघाच्या माध्यमातून शिक्षणाचे भगवीकरण केले जात असल्याचा आरोप विरोधक करत आहेत, पण असे नाही. काही कालवधीपुर्वी ख्रिश्चन लोकांनी आपल्या देशात असे प्रयत्न केले आहेत. त्यामुळेच आम्ही देशात योग्य राष्ट्रीयत्वाचा दृष्टिकोन देण्यासाठीच सत्तेत आलो आहोत." असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय धर्मजागरणचे संयोजक प्रा. शरदराव ढोले यांनी व्यक्त केले.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने महर्षी कर्वे व्याख्यानमाला 2020 आयोजित केली आहे. पहिल्या व्याख्यान 'राष्ट्रीय एकात्मता व त्यासमोरील आव्हाने' या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा स्मिता घैसास, कार्याध्यक्ष प्रमोद गोऱ्हे, व्यवस्थापक मंडळाच्या सभासद विद्या देशपांडे, विद्या कुलकर्णी, सचिव डॉ. पी. व्ही. एस. शास्त्री, शाम कुमार उपस्थित होते. प्रा. ढोले यांचा सत्कार कार्यक्रमाच्या घैसास यांनी केला. यावेळी संस्थेच्या 2019-20 या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
राष्ट्रीयत्वच्या बिंदूवर अभ्यासक्रम स्पष्ट का नाही. त्यामुळे, आतापर्यंत आपण आर्य हे बाहेरून आलो हेच शिकलो. असे सांगून प्रा. ढोले पुढे म्हणाले, "ख्रिश्चन लोकांनी चर्चच्या माध्यमातून देशात विविध संघटना स्थापन करीत काही हिंदूना वेगळी ओळख दिली. त्यांनाच हिंदू समाजाविरुद्ध लढायला भाग पाडले. परंतू सध्या देशात राष्ट्रवादी विचारांचे सरकार आहे. या सरकारने अशा सर्व गोष्टींवर पायबंद घालण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. राम जन्मभूमी आंदोलन हिंदू राष्ट्रीय समाजाने जिंकले. आता आतंकवादाला पायबंद घालण्यासाठी हिंदू समाज तयार आहे. संपूर्ण हिंदू जागृत करून हिंदूंना संघटित करायचे आहे."
प्रास्ताविक प्रमोद गोऱ्हे यांनी केले. विद्या देशपांडे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. शिशुविहार शाळेच्या शिक्षकांनी आश्रमगीत व संपूर्ण वंदेमातरम सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार स्वप्निल जोशी यांनी मानले.
(संपादन : सागर डी. शेलार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.