नवविवाहितेचा तपासणीच्या बहाण्याने डॉक्टरकडून विनयभंग 

crime
crime

शिरूर (पुणे) : पोटाच्या विकारामुळे अॅडमिट असलेल्या नवविवाहितेला तपासणी करण्याच्या बहाण्याने ओपीडीमध्ये बोलावून विनयभंग करणाऱ्या डॉक्टरला शिरूर पोलिसांनी आज अटक केली. न्हावरे (ता. शिरूर) येथील नाथकृपा हॉस्पिटलमध्ये काल (ता. ९) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. 

बिबट्या दिसल्याने फटाके वाजवले तर...
    
याबाबत वीस वर्षीय नवविवाहितेच्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी डॉ. रामहरी भुजंगराव लाड (रा. न्हावरे) याला आज अटक केली. याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, दोन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या विवाहितेच्या पोटात दुखत असल्याने ती शिरूर तालुक्यात गाव असलेल्या माहेरी आली होती. दरम्यान, तीच्या वडीलांनी न्हावरे येथील नाथकृपा हॉस्पिटलमध्ये बुधवारी (ता. ५) तीला उपचारार्थ दाखल केले. तेथे तिच्यावर उपचार चालू होते.

दरम्यान, काल (ता. नऊ) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास चेकअप करायचे आहे, असा निरोप देऊन डॉ. लाड याने या विवाहितेला बाह्यरूग्ण विभागात बोलावून घेतले. तेथे तपासणी करण्याच्या नावाखाली तिच्याशी असभ्य वर्तन केले. अश्लील बोलून विनयभंग केला. डॉक्टरचा हा गैरप्रकार लक्षात येताच विवाहितेने त्याला प्रतिकार केला. त्याने हात धरून ओढण्याचा प्रयत्न केला असता, संबंधित विवाहितेने त्याला ढकलून देत बाहेरच्या बाजूला पळ काढला आणि तेथून आपल्या पतीला दूरध्वनीवरून संपर्क साधून घडल्या प्रकाराची माहिती दिली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
    
याबाबत या नवविवाहित जोडप्याने आज शिरूर पोलिस ठाण्यात येऊन घडलेली माहिती पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांना सांगितली. त्यानंतर त्यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली. पोलिसांनी नवविवाहितेची फिर्याद घेऊन डॉ. लाड याच्याविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करून पोलिस पथकाने न्हावरे येथून डॉ. लाड याला अटक केली. दरम्यान, संबंधित हॉस्पिटलमध्ये यापूर्वीही रूग्ण महिलेच्या छेडछाडीचे प्रकार घडले असल्याच्या तक्रारी काही स्थानिक ग्रामस्थांनी केल्या असून, त्या अनुषंगाने पोलिस उपनिरीक्षक एस. एन. मोटे पुढील तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com