esakal | एल्गारची सूत्रे अखेर 'एनआयए'कडे; अशी घडली प्रक्रिया

बोलून बातमी शोधा

NIA

या प्रकरणात जप्त केलेला इलेक्‍ट्रॉनिक माहिती साठा व महत्वाची कागदपत्रेही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे त्याची इत्यंभुत माहिती घेतल्यानंतरच हे प्रकरण मुंबई येथे वर्ग करण्यात येणार आहे.

एल्गारची सूत्रे अखेर 'एनआयए'कडे; अशी घडली प्रक्रिया
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्य सरकार व न्यायालयाने एल्गारचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविण्याचा निर्णय घेतल्यानंतर सोमवारी (ता.१७) 'एनआयए'च्या अधिकारी पोलिस आयुक्तालयात दाखल झाले होते. त्यांच्याकडून या प्रकरणाची इत्यंभुत माहिती पुणे पोलिसांकडून घेतली जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एल्गार प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्याचे पत्र राज्य सरकारला दिले. त्याचवेळी केंद्र सरकारने या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी 'एनआयए'वर सोपविली. त्यानंतर राज्य सरकारने आपल्याला विश्‍वासात न घेता 'एनआयए'कडे तपास सोपविल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे 'एनआयए'ने न्यायालयात धाव घेतली होती.

- इंदुरीकर महाराजांवर शासन गुन्हा दाखल करणार नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा तपास 'एनआयए'कडे सोपविण्यास ग्रीन सिग्नल दिल्यानंतर अधिकाऱ्यांचे पथक सोमवारी (ता.१७) आयुक्तालयात दाखल झाले. 'एनआयए'चे एल्गार प्रकरणातील तपास अधिकारी पोलिस अधीक्षक विक्रम खलाटे यांच्यासह सहा ते सात अधिकाऱ्यांचे पथक सोमवारी दुपारी तीन वाजता पोलिस आयुक्तालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी पुणे पोलिसांचे एल्गार प्रकरणातील तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्याकडून खटल्यासंबंधी महत्वाची माहिती घेतली.

- पुणेकरांनो, शिवजयंतीच्या मिरवणुकीसाठी बाहेर पडताय? वाहतुकीतील बदल लक्षात घ्या!

याबरोबरच या प्रकरणातील महत्वाच्या मुद्ये समजून घेण्यास प्राधान्य दिले. या प्रकरणात जप्त केलेला इलेक्‍ट्रॉनिक माहिती साठा व महत्वाची कागदपत्रेही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे त्याची इत्यंभुत माहिती घेतल्यानंतरच हे प्रकरण मुंबई येथे वर्ग करण्यात येणार आहे. त्यासाठी आणखी तीन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्‍यता आहे.

- ज्येष्ठ मेकअप आर्टीस्ट पंढरीनाथ जुकर काळाच्या पडद्याआड