esakal | पुण्यातील नव्वद वर्षांच्या आजीबाई कोरोनातून मुक्त

बोलून बातमी शोधा

पुण्यातील नव्वद वर्षांच्या आजीबाई कोरोनातून मुक्त
पुण्यातील नव्वद वर्षांच्या आजीबाई कोरोनातून मुक्त
sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोरेगाव पार्क (पुणे): शुक्रवार पेठेतील चंद्रभागा भुरुक या नव्वद वर्षांच्या आजी नुकत्याच कोरोनातून मुक्त झाल्या. शिवाजीनगर येथील जम्बो कोविड केंद्रातून त्यांना सोडण्यात आले. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर व परिचारिकांचे त्यांनी आभार मानले. चंद्रभागा ह्या दोन वेळा कर्करोगातून तर एकदा हृदय विकारातून बऱ्या झाल्या आहेत. त्यांचे पती नारायण हे 'रिअल इस्टेट' ची लहान-सहान कामे करायचे. त्यांनी काही काळ चंदूलाल तालेरा यांच्या कडे काम केले होते. त्यांच्या पतीच्या निधनानंतर मुलबाळ नसलेल्या चंद्रभागा यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न होता. ही माहिती चंदूलाल तालेरा यांचा मुलगा सुभाष तालेरा यांना समजली. त्यानंतर गेली पंचवीस वर्ष ते त्यांची देखभाल करतात. त्यांनीच त्यांना रुग्णालयात दाखल करून कर्करोग व ह्रदय विकारातून बरे केले आहे.

हेही वाचा: 18 वर्षांवरील सर्वांना मोफत कोरोना लस; आंध्र प्रदेशचा कौतुकास्पद निर्णय

पंधरा दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समजताच सुभाष तालेरा यांनी शहरातील अनेक रुग्णालयात त्यांना दाखल करण्यासाठी धावपळ केली. माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी त्यांना चंद्रभागा यांच्या छातीचा एक्सरे काढण्यासाठी लावून शिवाजी नगर येथील जम्बो रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता तालेरा यांनी त्यांच्या सर्व तपासण्या केल्या.त्यांना जम्बो कोविड सेंटर मध्ये दाखल केले. येथे त्यांच्यावर वेळीच उपचार झाले.दहा दिवसांनंतर त्या पूर्णतः बऱ्या झाल्या. त्यांनी त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर व परिचारिकांचे अश्रूनयनांनी आभार मानले.