आता पुण्यात फिरा मिडीबसमधून; तेही फक्त 10 रुपयांत

Now Travel In Pune City by Midi Bus in 10 rupees only
Now Travel In Pune City by Midi Bus in 10 rupees only

पुणे : शहरातील वाहतूक कोंडी फोडून ती गतिमान करण्यासाठी या अर्थसंकल्पात 18 कलमी योजना सादर करण्यात आल्या आहेत. मिडी बस, उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, मेट्रोचे जाळे, बीआरटी, एचसीएमटीआर प्रकल्प, शिवणे-खराडी नदीकाठ रस्ता, कात्रज- कोंढवा रस्ता, बालभारती ते पौडफाटा रस्ता विकसित करणे आदी सुमारे सहाशे कोटी रुपयांच्या योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलो करा ई-सकाळचे ऍप 

शहरातील प्रमुख तेरा ठिकाणी उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेट उभारण्यासाठी तब्बल 230.79 कोटी रुपयांची सर्वाधिक तरतूद करण्यात आली आहे. तर शहरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या 'एसचीएमटीआर' (उच्च क्षमता वर्तुळाकार मार्ग) प्रकल्पासाठी 172 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर पीएमपीचा ताफ्यातील बसची संख्या वाढविण्यासाठी नवीन 300 ई बसेस खरेदी करण्यासाठी 72 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पूर्व व पश्‍चिम उपनगरांना जोडणाऱ्या शिवणे ते खराडी या 18 किलोमीटर रस्ता विकसित करण्यासाठी 18 कोटी रुपये, तर काजत्र ते कोंढवा रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 24 कोटी रुपयांची प्रस्तावित करण्यात आले आहेत.

पुणे महापालिका अर्थसंकल्प : 1500 कोटी रूपयांहून अधिक अर्थिक तरतूद

महामेट्रोकडून हाती घेण्यात आलेल्या वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड या दरम्यानच्या मेट्रो प्रकल्पाचे विस्तारीकरण करण्याबरोबरच सिंहगड रस्ता ते पुणे कॅटोमेन्ट, वारजे ते स्वारगेट, रामवाडी ते वाघोली व वनाज ते चांदणी चौक आणि स्वारगेट ते कात्रज आणि शिवाजीनगर ते हडपसर या मार्गांचा सर्वंकष प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर शहरातील 18 उड्डाणपुलाच्या खाली मोकळ्या जागेवरील अनधिकृत पार्किंग आणि अतिक्रमण होते. ते टाळण्यासाठी पुलाखालील जागा बंदिस्त करून तेथे सुशोभीकरण करण्यासाठी चार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. लालमहाल ते फडगेट पोलिस चौकी दरम्यान होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ग्रेड सपेटर प्रस्तावित करण्यात आला असून त्यासाठी चार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर "एक रस्ता एक एकक' ही नवीन संकल्पना प्रथमच मांडण्यात आली आहे. त्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच बंडगार्डन जंक्‍शन ते मुंढवा पूल डीपी रस्त्यासाठी, खडकवासला ते स्वारगेट सायकल ट्रक उभारण्यासाठी प्रत्येकी 2 कोटी, साधू वासवानी ते बंडगार्डन पूल पुर्नर्निर्मिती करणे, बीआरटी मार्गासाठी 9 कोटी 60 लाख रुपये, वाहतूक जनजागृती अभियानासाठी 50 लाख, बालभारती ते पौडफाटा 2 किलोमीटर लांबीच्या आणि 30 मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी 32 लाख रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टोलच्या दरात अठरा टक्क्यांनी वाढ

शहराच्या मध्यवस्तीत भागातील रस्त्यांची रुंदी कमी असल्याने मध्यम आकाराच्या 32 आसनी क्षमतेच्या मिडी बस भाडेतत्त्वावर घेण्याची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यासाठी या अर्थसंकल्पात 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. डेक्‍कन ते पूलगेट, स्वारगेट ते पुणे स्टेशन, स्वारगेट ते शिवाजीनगर (भवानी पेठ, गंजपेठ मार्गे) या मार्गसह स्वारगेट-टिळक रस्ता- खजिना विहीर- अप्पा बळवंत चौक, पुणे स्टेशन मार्ग पूलगेट हा वर्तुळाकार मार्ग या गाड्यांसाठी प्रस्तावित केला आहे. या मार्गावर तिकिटाचे शुल्क दिवसभरासाठी दहा रुपये असणार आहे, असेही या प्रस्तावात नमूद केले आहे.

अजित पवारांऐवजी देवेंद्र फडणवीसांचा फोटो छापल्याने गोंधळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com