
नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही बुधवारी (ता.2) रात्री आठ वाजल्यापासून गुरुवारी (ता.3) रात्री आठ वाजेपर्यंतची आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यात गुरुवारी (ता.3) दिवसभरातील कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत नवीन रुग्णांच्या तुलनेत वाढ झाली आहे. जिल्ह्यात गुरुवारी 793 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याउलट 1 हजार 52 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
- पुणे : गुटखा हवाला रॅकेटचा पर्दाफाश; 3.5 कोटींची रोकड अन् 9 जण पोलिसांच्या ताब्यात
दिवसभरातील एकूण कोरोना रुग्णांत पुणे शहरातील 355 जण आहेत. गेल्या 24 तासांत 9 हजार 389 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. अन्य 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये 165, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 191, नगरपालिका कार्यक्षेत्रात 67 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 15 नवे रुग्ण आढळून आले आहेत. एकूण मृत्यूंमध्ये पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येकी सात आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील चार रुग्णांचा समावेश आहे. नगरपालिका आणि कॅंन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही.
- मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना दिलासा; सरकारकडून करमाफीचा सुधारित आदेश प्रसिद्ध
जिल्ह्यात सध्या विविध रुग्णालयात 4 हजार 335 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच 6 हजार 906 रुग्णांवर त्यांच्या घरातच उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत 8 हजार 449 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 405 रुग्ण आहेत. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही बुधवारी (ता.2) रात्री आठ वाजल्यापासून गुरुवारी (ता.3) रात्री आठ वाजेपर्यंतची आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)