सासवडकर झाले भयभीत; का ते वाचा सविस्तर

corona-j.jpg
corona-j.jpg

सासवड : आज सासवड शहरातील कोरोना पाॅझीटिव्ह रुग्णांचा आकडा एकदम 7 वाढून.. शहर 71 वरुन 78 वर पोचले आहे. नित्यपणे रुग्ण आढळून येण्याचे सत्र थांबत नसल्याने.. सासवडकर आज भयभीत झाले आहेत. तर आज तालुक्यातील सासवडसह दिवे, बेलसर व वनपुरी गावात कोरोनाने शिरकावा केला. 

या तीनसह बाधीत सुपे खुर्द गावात प्रत्येकी एक  - एक रुग्ण  पाॅझीटिव्ह आले. पैकी दिवे व वनपुरीचे जुन्या रुग्ण संपर्कातील व बेलसर आणि सुप्यातील रुग्ण नवीन आहेत. सासवडच्या आजच्या पाॅझीटिव्ह एकुण सातपैकी जुन्या रुग्ण संपर्कातील तीन व नवीन चार रुग्ण सापडलेत. त्यातून तालुका कालच शतक ओलांडत 101 वर पोचला होता; आज हा एकुण पाॅझीटिव्ह आकडा 112 वर पोचला. येथे काम करणारा पण भोर तालुक्यात राहाणाराही एक रुग्ण आहे; त्याची भोरकडे झाली. आजही पुरंदर तालुक्यातील एकूणात 70 टक्के रुग्ण एका सासवड शहरातील आहेत. 

याबाबत तहसीलदार रुपाली सरनौबत यांनी माहिती दिली. ग्रामीणमधील कन्टेन्मेंट झोन वगळून गावेही वाढत आहेत.
सासवडचे कन्टेन्मेंट झोन तीसपर्यंत गेल्याने नगरपालिका मुख्याधिकारी विनोद जळक यांनी  कालपासून सासवड शहरात लाॅकडाऊन केला. त्यामुळे शहरातील गर्दी कमी झाली आहे. विना मास्क लोकांवर कारवाई वाढविल्याचे आरोग्य प्रमुख मोहन चव्हाण यांनी सांगितले. आताचा हा लाॅकडाऊन प्रभावी होण्यासाठी तो 15  दिवसांपर्यंत वाढवावा. कारण सासवडने एकट्यानेच पाऊणशतक आज पूर्ण केले आहे. त्यातून साखळी काही प्रमाणात तुटण्यासाठी थोडा त्रास सहन करावा; असे काही जाणकारांकडून आज मत व्यक्त झाले.

आता पुणे व इतर बाहेरुन ये-जा करणारांना पालिकेत नोंदणी, कोरोनाबाबत वैदयकीय प्रमाणपत्र, होम क्वारंटाइन राहणे... यावर पालिकेने आदेश मोघम बजावले आहेत. त्याची अंमलबजावणी घरापर्यंत जाऊन शंभर टक्के झाली; तर शहरात संसर्गावर नियंत्रण येईल. पण याबाबत घरोघरी सर्वेक्षण करण्याबाबत धिमे काम चालले आहे., असेही दिसत आहे. हेच पालिकेच्या अंगलट येईल; असे संकेत आहेत.
पुणेकरांनो, घराबाहेर पडताय? रेनकोट, छत्री सोबत असु द्या, कारण...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com