पुण्यातील जम्बो कोविड केअर सेंटरमधील रुग्णांचा आकडा झाला कमी

number of patients at Jumbo Covid Care Center Pune come down
number of patients at Jumbo Covid Care Center Pune come down

पुणे - शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्याच प्रमाणात जम्बो कोविड केअर सेंटरमधील रुग्णांचा आकडा कमी झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. गेल्या २५ दिवसांपूर्वी दाखल रुग्णांचे प्रमाण ३१४ होते, ते आता २१५ पर्यंत कमी आले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी मैदानावर खास कोरोनाबाधीत रुग्णांच्या उपचारांसाठी जम्बो कोविड केअर सेंटर उभारले आहे. पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांनी हे सेंटर उभारले असून, पुणे महापालिकेतर्फे (पीएमसी) ते चालविण्यात येत आहे. यातून आतापर्यंत ८० टक्‍क्‍यांहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच, बारेशेहून अधिक रुग्ण उपचारांसाठी दाखल झाले आहेत. त्यातही ज्येष्ठ आणि मध्यमवयीन नागरिकांची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती सेंटरने दिली.

जम्बो सेंटरमध्ये १४ ऑक्‍टोबरला ३१४ रुग्ण उपचारांसाठी दाखल होते. ही संख्या गेल्या २५ दिवसांमध्ये २१५ पर्यंत कमी झाली. त्यातही आजच्या एका दिवसात नव्याने दाखल रुग्णांची संख्या फक्त दोन आहे. त्यामुळे बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. तर, नव्याने दाखल होणाऱ्या कोरोनाबाधीतांचा आकडा यापूर्वीच्या तुलनेत खूप कमी असल्याचेही सांगण्यात आले.

‘जम्बो’मध्ये सध्या १२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी १३९ रुग्ण जनरल वॉर्डमध्ये दाखल आहेत. अतिदक्षता विभागात २९ रुग्ण असून, ‘हाय डिपेंडन्सी युनिट’मध्ये (एचडीयू) ४७ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. रुग्णांना आवश्‍यक असणाऱ्या बहुतांश सर्व औषधांचा पुरवठा येथे केला जातो. त्यासाठी कोणतेही पैसे आकारले जात नाहीत.

पुण्यातील एका महाविद्यालयातील प्राध्यापक उपचारांसाठी जम्बो हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. त्यांच्यावर १२ दिवस अतिदक्षता विभागात आणि त्यानंतर आतापर्यंत वॉर्डमध्ये उपचार करण्यात आले. ते म्हणाले, ‘‘जम्बो रुग्णालयातील डॉक्‍टर, नर्सेस आणि वॉर्ड बॉय यांची सेवा अत्यंत चांगली आहे. रुग्णाला नेमक्‍या कोणत्या टप्प्यावर कोणते उपचार करायचे, याचा डॉक्‍टरांचा अभ्यास चांगला आहे. त्यामुळे रुग्णावर प्रभावी उपचार करून त्यांना कोरोनाच्या संसर्गाच्या धोक्‍यातून बाहेर काढण्यात त्यांना यश येते.’’

''पुण्यातील इतर रुग्णालयांच्या तुलनेत ‘जम्बो’मधील दाखल कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त आहे. कारण, हे फक्त कोरोनाबाधितांच्या उपचारांसाठी सुरू केलेले सेंटर आहे. तसेच, येथील रुग्णसेवेचा दर्जा सातत्याने वाढत गेला आहे.''
- श्रेयांस कपाले, वैद्यकीय अधीक्षक, जम्बो कोविड केअर सेंटर 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com