esakal | गावठी पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या तरुणाला किरकटवाडीत घेतले ताब्यात 
sakal

बोलून बातमी शोधा

One arrested for carrying pistol in Kirkatwadi

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने किरकटवाडी फाटा, श्रेयस हॉस्पिटल कॉर्नरलगत रस्त्याचे कडेला सापळा लावून ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केल्यावर अमर नामदेव शिंदे (वय २७ रा.कासार आंबोली काल भैरवनाथ मंदिरासमोर ता.मुळशी जि. पुणे) अशी माहिती दिली.

गावठी पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या तरुणाला किरकटवाडीत घेतले ताब्यात 

sakal_logo
By
राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : गावठी पिस्तुल विक्रीसाठी घेऊन आलेल्या तरुणाला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची सापळा रचून कारवाई किरकटवाडी येथून ताब्यात घेतले. हवेली पोलिस स्टेशन हद्दीत ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला किरकटवाडी येथे एकजण गावठी पिस्तुल विक्रीस घेऊन येणार आहे. अशी गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने किरकटवाडी फाटा, श्रेयस हॉस्पिटल कॉर्नरलगत रस्त्याचे कडेला सापळा लावून ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केल्यावर अमर नामदेव शिंदे (वय २७ रा.कासार आंबोली काल भैरवनाथ मंदिरासमोर ता.मुळशी जि. पुणे) अशी माहिती दिली. त्याठिकाणी त्याची अंग झडती घेतली. त्याचे पॅन्टच्या आत कमरेला एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तुल आढळले. मतो याठिकाणी पिस्तुल व दोन काडतुस विक्री करण्यासाठी उभा होता. आरोपीकडून एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तुल मॅगजीन सह ३५ हजार रुपये किंमतीचे व दोन जिवंत काडतुसे २०० रु किंमतीचे असा एकूण ३५ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

Corona: रुग्णांसाठी बेडचा ‘मुंबई पॅटर्न’ राज्यभर; मुख्य सचिवांनी दिली माहिती​

आरोपी मुद्देमालसह पुढील तपासासाठी हवेली पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलिस उपनिरीक्षक अमोल गोरे, रामेश्वर धोंडगे, पोलिस हवातदार हनुमंत पासलकर, प्रमोद नवले, पोलिस कॉन्स्टेबल अमोल शेडगे, मंगेश भगत यांनी केली आहे.

‘पंच’नामा : संचारबंदीतील ‘विरंगुळा’

loading image