पुणे - सोलापूर महामार्गावर कोयत्याचा धाक दाखवून लूटणाऱ्याला अटक

one arrested for Robbing one on pune solapur highway by threatening with Sharp Weapon
one arrested for Robbing one on pune solapur highway by threatening with Sharp Weapon

​उरुळी कांचन (पुणे) : पुणे - सोलापूर महामार्गावर एका व्यक्तीला कोयत्याचा धाक दाखवून लाकडी दांडक्याने मारहाण करून पैसे लुटणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. स्थानिक गुन्हे (ग्रामीण) अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. गणेश उर्फ आबा मधुकर माने (वय-१९, रा. मोरे वस्ती, कोरेगाव मूळ, ता. हवेली ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, सोमवारी (ता. ०८ ) पुणे - सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी गावच्या हद्दीत सेवा रस्त्यावरून पहाटे चालत जाणार्‍या व्यक्तीस गणेश व त्याचे दोन साथीदार गाडीवर आले व त्याला लोखंडी कोयता दाखवून मारहाण केली.  फिर्यादीकडील एक मोबाइल फोन व त्याच्याजवळील दोन हजार रुपये घेऊन गेल्याची तक्रार लोणी काळभोर पोलिसात दिली होती. 

Video: IPS कृष्ण प्रकाश यांची 'मन की बात'; मुळशी पॅटर्नचा केला 'अभ्यास'

दरम्यान, हा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सुरू केला. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, राम धोंडगे, पोलिस हवालदार उमाकांत कुंजीर, पोलिस नाईक, राजू मोमिन, पोलिस कॉन्स्टेबल धिरज जाधव, दगडू वीरकर यांच्या पथकाला एका खबरीकडून माहिती मिळाली. ''गणेश माने हा त्या ठिकाणी गाडी चालवत होता. व त्याच्याकडे लाल रंगाची दुचाकी आहे.'' या माहितीच्या आधारे गणेश माने याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, गणेश माने व त्याच्या दोन साथीदारांनी गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. तपास लोणी काळभोर पोलिस करीत आहेत.

काय सांगता! ट्रकपेक्षाही विमानाचं इंधन स्वस्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com