आम्हाला शिवीगाळ का करतो? म्हणत त्यांनी चक्क फेकून मारला दारूचा ग्लास अन्..

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

फिर्यादी हे त्यांच्या मित्रासोबत संबंधित बारमध्ये दारू पीत बसले होते. दरम्यान, त्यांची बारमधील कॅप्टनसोबत बाचाबाची झाली. त्यामुळे फिर्यादींनी बारमध्ये बसलेल्या इतर ग्राहकांना उद्देशून शिवीगाळ केली.

पुणे : बारमध्ये दारू पीत असताना शेजारी बसलेल्यांना उद्देशुन शिवीगाळ केल्याने ग्लास मारून डोके फोडल्याचा प्रकार घडला. धायरी रोडवरील एका बारमध्ये रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. 

शिवभोजन केंद्रासाठी अर्जांचा ढिग; पिंपरी-चिंचवडमध्ये 56 चालक इच्छुक

या बाबत नऱ्हे येथील कृष्णाईनगरमधील एका 30 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

....म्हणून डीएसकेंची चार महागडी वाहने लिलावातून वगळली 
 

फिर्यादी हे त्यांच्या मित्रासोबत संबंधित बारमध्ये दारू पीत बसले होते. दरम्यान, त्यांची बारमधील कॅप्टनसोबत बाचाबाची झाली. त्यामुळे फिर्यादींनी बारमध्ये बसलेल्या इतर ग्राहकांना उद्देशून शिवीगाळ केली. त्यामुळे त्यांच्या शेजारी बसलेल्या टेबलावरील तिघांनी आम्हाला शिवीगाळ का करतो? अशी विचारणा केली. तसेच त्यातील एकाने दारूचा ग्लास फेकून मारला त्यामुळे फिर्यादींचे डोके फुटले आहे. 

अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन बलात्कार करणाऱ्याला आजन्म कारावासाची शिक्षा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one injured in the bar due to using slang for other in pune