अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन बलात्कार करणाऱ्याला आजन्म कारावासाची शिक्षा

मिलिंद संगई
Wednesday, 12 February 2020

पिडीतेच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध अपहरण, बलात्कार, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण व अँट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर यांनी या प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

बारामती : अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप निष्पन्न झाल्यानंतर संदीप उर्फ संभाजी पोपट शेंडकर (रा. शेंडकरवाडी, ता. बारामती) याला येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश आर. व्ही. लोखंडे यांनी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सभागृहनेतेपदी नामदेव ढाके यांची निवड

वाघळवाडीनजिक एका शेतमजूराची अल्पवयीन मुलगी कानातील रिंग आणण्यासाठी गेलेली असताना दुचाकीवरुन आलेल्या संभाजी पोपट शेंडकर याने तिला कालव्याच्या बाजूला नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना 26 मे 2018 रोजी घडली होती. या घटनेनंतर मुलगी दिसेनाशी झाल्याचे समजल्यावर तिचा शोध सुरु झाला. पोलिसांनीही सीसीटीव्ही कॅमेरे व लोकांकडे माहिती घेत तपास सुरु केला. मात्र दोघांनी शेंडकर याला मुलीला दुचाकीवरुन सोडताना हटकले होते, त्या वरुन हा आरोपी निष्पन्न झाला होता. दरम्यान, त्याने केडगाव रेल्वे स्थानकावरुन पळून जाण्याची तयारी केली होती. मात्र पोलिसांनी मोबाईलच्या लोकेशनवरुन त्याला तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पाटील, विठ्ठल कदम, सचिन वाघ व अन्य कर्मचाऱयांनी रेल्वे स्थानकावरच ताब्यात घेतले.

रुणीला एमबीबीएसला अॅडमिशन देतो म्हणाला अन्

 पिडीतेच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध अपहरण, बलात्कार, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण व अँट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर यांनी या प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

पिंपरी : गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून चोरट्यांनी लुटले 12 लाख 84 हजार

न्यायाधिश आर. व्ही. लोखंडे यांच्यासमोर हा खटला चालला. त्यात सरकार पक्षातर्फे अॅड. अरुंधती रासकर यांनी काम पाहिले. त्यांनी केलेला युक्तिवाद व उपलब्ध साक्षी पुराव्याच्या आधारे न्यायाधिश लोखंडे यांनी शेंडकर याला आजन्म कारावास व 55 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकार पक्षाला वडगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे, हवालदार एन. ए. नलवडे यांनी सहकार्य केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sentenced to life imprisonment to accusued for Minor girl kidnapped and raped case