शिवभोजन केंद्रासाठी अर्जांचा ढिग; पिंपरी-चिंचवडमध्ये 56 चालक इच्छुक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

गरीब आणि गरजू लोकांना स्वस्त दरात जेवण उपलब्ध व्हावे यासाठी राज्य सरकारने शिवभोजन योजना सुरु केली आहे. त्याअंतर्गत, लोकांना 2 चपात्या, 1 वाटी भाजी, 1 वाटी वरण आणि 1 मूद भात अशी थाळी केवळ 10 रुपयांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शहरात सध्या पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, आकुर्डी, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, पिंपरी-चिंचवड महापालिका उपहारगृह आणि वल्लभनगर एस.टी.स्थानक अशा 4 केंद्रांवर ही योजना राबविली जात आहे. या चारही केंद्रांसाठी एकूण 500 थाळी उपलब्ध करुन दिल्या जात आहे. 
 
पिंपरी: राज्य सरकारची शिवभोजन योजना सुरु करण्यासाठी पिंपरी विभाग आणि चिंचवड विभागामधून उपहारगृहे चालकांच्या उड्या पडल्या आहेत. सुमारे 56 चालकांनी शिवभोजन केंद्र सुरु करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासंदर्भात, शहर अन्न धान्य वितरण अधिकारी कार्यालयाला कळविण्यात आले आहे.

....म्हणून डीएसकेंची चार महागडी वाहने लिलावातून वगळली 

गरीब आणि गरजू लोकांना स्वस्त दरात जेवण उपलब्ध व्हावे यासाठी राज्य सरकारने शिवभोजन योजना सुरु केली आहे. त्याअंतर्गत, लोकांना 2 चपात्या, 1 वाटी भाजी, 1 वाटी वरण आणि 1 मूद भात अशी थाळी केवळ 10 रुपयांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शहरात सध्या पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, आकुर्डी, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, पिंपरी-चिंचवड महापालिका उपहारगृह आणि वल्लभनगर एस.टी.स्थानक अशा 4 केंद्रांवर ही योजना राबविली जात आहे. या चारही केंद्रांसाठी एकूण 500 थाळी उपलब्ध करुन दिल्या जात आहे. 

अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन बलात्कार करणाऱ्याला आजन्म कारावासाची शिक्षा

अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून माहितीनुसार, योजनेसाठी दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत उपहारगृहे किंवा भोजनालय चालकांकडे राखीव जागा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. एकाच वेळेस किमान 25 लोकांची व्यवस्था त्यांना करावी लागेल. कोणत्याही परिस्थितीत शिळे अथवा खराब धान्य लाभार्थ्यांना दिले जाऊ नये. केंद्र सुरु करण्यासाठी आवश्‍यक शासकीय, निमशासकीय परवानग्या चालकांनी घेणे गरजेचे राहील. पोषक तत्वे असलेल्या भाज्यांची निवड केली जावी, केंद्र परिसरात स्वच्छता ठेवावी, ओला-सुका कचरा वेगळा केला जावा आदी सूचना शासनाने केल्या आहेत. शिवभोजन केंद्रांचा आढावा घेतल्यावर नवीन केंद्रे सुरु करण्याबाबत राज्य सरकारच्या पातळीवर निर्णय होऊ शकेल. 

पिंपरी : गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून चोरट्यांनी लुटले 12 लाख 84 हजार

"चिंचवड (अ विभाग) मधून 30 तर पिंपरी (ज विभाग) मधून 26 उपहारगृह आणि भोजनालय चालकांनी शिवभोजन केंद्र सुरु करण्याची तयारी दर्शविली असून तसे अर्ज प्राप्त झाले आहेत. हे सर्व अर्ज शहर अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत.''
- डी.एन.तावरे, परिमंडळ अधिकारी 'अ' व 'ज' विभाग, अन्न व पुरवठा कार्यालय.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To start Shiv Bhojan Kendra 56 Owners are willing in Pimpri Chinchwad