लिंक उघडली अन् दीड लाख रुपये झाले गायब!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

तक्रारदार महिलेला जुना डायनिंग टेबल विक्री करायचा होता. त्याची जाहिरात ओएएलएक्‍सवर टाकली होती.

पुणे : ओएलएक्‍सवरून डायनिंग टेबल विक्री केल्यानंतर पैसे घेण्यासाठी एक लिंकवर बँकेची माहिती भरली. त्यानंतर बँक खात्यातून 1 लाख 64 हजार 999 रुपये ऑनलाईन काढून घेऊन दोन महिलांची फसवणूक करण्यात आली. याबाबत कोंढव्यातील 28 वर्षीय महिलेने यासंदर्भात कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

- मिठी मारली अन् घडले...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेला जुना डायनिंग टेबल विक्री करायचा होता. त्याची जाहिरात ओएएलएक्‍सवर टाकली होती. एकाने हा डायिनंग टेबल विकत घेण्यासाठी फोन केला. पैसे लगेच पाठवतो असे सांगत त्याने फिर्यादी यांना एक लिंक पाठवली, त्यामध्ये त्यांनी बँकेची माहिती भरली. तक्रारदार यांनी ती लिंक उघडून माहिती भरल्यानंतर त्यांच्या खात्यामधून 65 हजार रूपये काढून घेतले.

- वाढदिवसासाठी बॉलिवूडचा खिलाडी गेलाय 'या' खास ठिकाणी

अशाच प्रकारे उंड्री येथील एका महिलेने जुने फर्निचर ओएलएक्‍सवरून विकले. तिनेही पैसे घेण्यासाठी लिंकमध्ये माहिती भरली असता त्यांचे 99 हजार 999 रूपये खात्यामधून काढून घेतले. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) महादेव कुंभार करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one lac fifty thousand rupees disappeared after opening of link