इंदापुरातील `त्या` 15 जणांचे कोरोना रिपोर्ट...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 May 2020

इंदापूर प्रशासनाने अत्यंत काळजी घेत कोरोनास दूर ठेवले होते. भिगवण स्टेशन येथील कोरोना बाधीत जेष्ठ महिलेचा मृत्यू झाल्या नंतर 48 जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. हा अपवाद वगळता पाच पैकी चार रुग्ण मुंबई तर 1 रुग्ण पुण्यावरून इंदापूर तालुक्यात आले होते.

इंदापूर (पुणे) : इंदापूर तालुक्‍यातील बिजवडी ग्रामपंचायतीअंतर्गत पोंदकुलवाडी परिसरामध्ये मुंबईहून परतलेल्या मायलेकरांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. या कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 15 व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने पुणे येथे कोरोना चाचणीसाठी पाठविले होते. यापैकी 14 जणांची चाचणी निगेटिव्ह आली तर एका व्यक्तीचा चाचणी अहवाल प्रलंबित आहे.

युवतीला विमान चालविण्याचे प्रशिक्षण देताना 'त्याने' केले हे कृत्य; अन् मग...

पळसदेव येथील 11 जणांचे नमुने पुणे येथे पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल 25 मे रोजी मिळणार असल्याची माहिती तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली. त्यामुळे इंदापूरकरांना दिलासा मिळाला आहे. तालुक्यात 28 एप्रिल रोजी भिगवण स्टेशन परिसरात एका 63 वर्षीय महिलेला कोरोणाची लागण झाली होती. त्यांचा पुणे येथे औषधोपचार सुरू झाल्यानंतर मृत्यू झाल्याने कोरोनाचे खाते इंदापूर तालुक्यात उघडले गेले. त्यामुळे ग्रीन झोनमध्ये असलेला इंदापूर तालुका रेड झोनमध्ये आला. त्यानंतर 16 मे रोजी मुंबईवरून इंदापूर तालुक्यात शिरसोडी या मूळ गावी परतलेल्या मायलेकींना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले.

खासदारपदाच्या हॅटट्रिकच्या वर्षपूर्तीनिमित्त सुप्रिया सुळे यांनी केलाय `हा` संकल्प

सध्या या दोघींवर इंदापूर येथे उपचार सुरू आहेत. त्यानंतर एक आठवडयातच 22 मे रोजी पोंदकुलवाडी परिसरात मुंबईवरून परतलेल्या मायलेकरांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले. त्यामुळे संपूर्ण इंदापूर तालुक्यात एकच खळबळ माजली. या दोन्ही कोरोना बाधित रुग्णांना तत्काळ इंदापूर जवळील डॉक्टर कदम गुरुकुल या कोरोना केअर सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. हे दोन्ही रुग्ण किती जणांच्या  संपर्कात आले. याचा तपास इंदापूर प्रशासना कडून करण्यात आला.

जुन्नर बाजार समितीला कोरोनाचा मोठा फटका; तब्बल...

संपर्कात आलेल्या 15 व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. त्याच दिवशी त्यांचे स्वॅब देखील घेण्यात आले. त्यांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून एकूण 15 व्यक्तींपैकी  14 व्यक्तींची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे तर एका व्यक्तीचा अहवाल प्रलंबित असल्याचे तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी सांगितले.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा 

इंदापूर प्रशासनाने अत्यंत काळजी घेत कोरोनास दूर ठेवले होते. भिगवण स्टेशन येथील कोरोना बाधीत जेष्ठ महिलेचा मृत्यू झाल्या नंतर 48 जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. हा अपवाद वगळता पाच पैकी चार रुग्ण मुंबई तर 1 रुग्ण पुण्यावरून इंदापूर तालुक्यात आले होते. मात्र त्यांची माहिती संबंधितांनी न दिल्याने तालुक्यास कोरोनाच्या उत्तरार्धात कोरोनाचे संकट गडद झाल्याने इंदापुरकर हवालदिल झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one person affected by corona in indapur