esakal | जुन्नर तालुक्यात कांद्याला उच्चांकी भाव
sakal

बोलून बातमी शोधा

onion.jpg

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारपेठेत गुरुवारी 15 हजार 900 कांदा पिशव्यांची आवक झाली. चांगल्या प्रतीच्या कांद्यास दहा किलोस 200 रुपये भाव मिळाला. 

जुन्नर तालुक्यात कांद्याला उच्चांकी भाव

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जुन्नर (पुणे) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारपेठेत गुरुवारी 15 हजार 900 कांदा पिशव्यांची आवक झाली. चांगल्या प्रतीच्या कांद्यास दहा किलोस 200 रुपये भाव मिळाला. 

'आरटीई'च्या राखीव जागांवरील प्रवेशासाठी ३१ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत   
लिलावात प्रतवारीनुसार मिळालेला भाव पुढील प्रमाणे : एक नंबर - 142 ते 200, दोन नंबर - 100 ते 140, तीन नंबर - 20 ते 100. ओतूर येथील उपबाजारात 28 हजार 338 कांदा पिशवीची आवक झाले. चांगल्या प्रतीच्या कांद्यास दहा किलोस 225 रुपये भाव मिळाला.

येवा वाढल्याने खडकवासला धरणातील विसर्गात वाढ

लिलावात मिळालेला भाव पुढीलप्रमाणे (प्रती 10 किलो) ः एक नंबर 190 ते 225, दोन नंबर 170 ते 190, तीन नंबर 100 ते 170, चार नंबर 30 ते 100. उपबाजार आळेफाटा येथील उपबाजार पेठेत शुक्रवारी 19 हजार 115 कांदा पिशव्यांची आवक झाली.

 Video : रामभक्तांसाठी आनंदाची बातमी; रामाची चलनी नोट आहे पुण्यात!

प्रतवारीनुसार प्रती 10 किलोस पुढीलप्रमाणे भाव मिळाला ः गोळा - 165 ते 180, एक नंबर कांदा - 120 ते 165, गोल्टा - 100 ते 120, जोड गोल्टी - 50 ते 100. कांद्याचे बाजारभाव वाढत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे. 

loading image
go to top