पुण्यात बुधवारी होणार १८ हजार डोसचे लसीकरण

लसीकरण मोहिमेवर परिणाम
vaccine
vaccinesakal

पुणे : गेल्या तीन दिवसांपासून लसीकरण बंद असताना केंद्र शासनाकडून (central govt) महापालिकेला कोव्हीशील्डचे १८ हजार डोस मिळाले आहेत. त्याचा परिणाम शहरातील लसीकरण मोहिमेवर झाला असून, उद्या (बुधवारी) ६० ठिकाणी कोव्हीशील्ड तर ६ ठिकाणी कोव्हॅक्सीनचे लसीकरण होणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. (Only 18,000 doses pmc)

महापालिकेचे २०० केंद्र असल्याने प्रत्येक केंद्रावर १०० डोस द्यायचे असले तरी किमान २० हजार डोसची आवश्‍यकता असते. पण आज शासनाकडून महापालिकेला कोव्हीशील्डचे १८ हजार डोस मिळाल्याने लसीकरण केंद्रांची संख्या घटवली आहे. बुधवारी महापालिकेच्या ६० दवाखान्यांमध्ये कोव्हीशील्डचे प्रत्येकी २०० डोस उपलब्ध करून दिल्याने १२ हजार डोसचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित ६ हजार डोस महापालिकेतर्फे विविध घटकांसाठी केल्या जाणाऱ्या लसीकरणासाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे केवळ एकच दिवस लसीकरण होईल.

कोव्हॅक्सीन लस महापालिकडे उपलब्ध असून, त्याद्वारे ६ केंद्रावर प्रत्येकी ३०० डोस देण्याल आले आहेत.

कोव्हीशील्ड

- पहिल्या डोससाठी २० टक्के लस ऑनलाईन बुकींगद्वारे

- पहिल्या डोससाठी २० टक्के लस थेट केंद्रावर उपलब्ध

- पहिला डोस ८४ दिवसांपूर्वी (११मे) घेतलेल्यांच्या दुसऱ्या डोससाठी ३० टक्के लस ऑनलाईन

- थेट केंद्रावर येणाऱ्यांसाठी ३० टक्के लस दुसऱ्या डोससाठी

vaccine
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेबाबत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

कोव्हॅक्सीन

- पहिल्या डोससाठी ऑनलाईन बुकिंग केलेल्या नागरिकांसाठी २० टक्के लस

- पहिल्या डोससाठी थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी २० टक्के लस

-७ जुलै पूर्वी पहिला डोस (२८ दिवस) घेतल्याच्या दुसऱ्या डोससाठी ४० टक्के लस ऑनलाईन बुकींगद्वारे उपलब्ध

- दुसऱ्या डोससाठी थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी २० टक्के लस उपलब्ध

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com