करवाढीच्या प्रस्तावाला विरोध;वाढ न करण्याची राजकीय पक्षांसह स्वयंसेवी संस्थांकडून मागणी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 January 2021

नियमित कर भरणाऱ्यांना करवाढीचा शिक्षा; तर कर थकविणाऱ्यांना सवलतीची योजना का, असा प्रश्‍न विचारत ही कारवाढ करू नये, अशी मागणीही करण्यात आली आहे. 

पुणे - नव्या आर्थिक वर्षात पुणेकरांवर करवाढ लादण्याच्या महापालिका प्रशासनाच्या प्रस्तावाला राजकीय पक्षांसह स्वयंसेवी संस्थांनीही विरोध केला आहे. नियमित कर भरणाऱ्यांना करवाढीचा शिक्षा; तर कर थकविणाऱ्यांना सवलतीची योजना का, असा प्रश्‍न विचारत ही कारवाढ करू नये, अशी मागणीही करण्यात आली आहे. 

IAF Recruitment 2021: १२वी पास उमेदवारांनो, एअरमन पदांसाठी निघाली भरती!​

महापालिकेच्या उत्पन्नात घट झाल्याने ते वाढविण्यासाठी मिळकत करात 11 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीपुढे मांडला आहे. प्रस्तावित करवाढीमुळे महापालिकेला 130 कोटी रुपयांचा जादा महसूल मिळण्याचा आशा महापालिकेला आहे. मात्र, हा प्रस्ताव दाखल झाल्यापासून महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनीही त्याला विरोध केला. 

'मुलाला वाचवायचं असेल तर ५ लाख द्या'; खुनाची धमकी देत महिला डॉक्‍टरकडे मागितली खंडणी

कॉंग्रेसचे गटनेते आबा बागूल म्हणाले, ""शहरातील हजारो मिळकतींची महापालिकेकडे नोंद झालेली नाही. ती करून महसुलात वाढ करता येईल. मात्र, त्यावर कार्यवाही होत नाही. अशा स्थितीत नव्याने करवाढ करणे योग्य नाही. तिला कॉंग्रेसचा विरोध असेल. उत्पन्नवाढीच्या नव्या उपायांचीही अंमलबजावणी केली जात नाही. ही करवाढ करायची होती; तर मिळकतकर न भरलेल्या थकबाकीदारांना कराच्या दंडाच्या रक्कमेत 75 टक्के सवलत का दिली. '' 

Makar Sankranti 2021: मकर संक्रांत आणि पतंगाचं कनेक्शन काय?​

सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर म्हणाले, ""शहरातील सुमारे पावणेपाचशे मिळकतधारकांकडे सुमारे सव्वाबाराशे कोटी रुपयांची थकबाकी आहे. ती वसूल केली जात नसताना नियमित कर भरणाऱ्यांवर करवाढीचा बोजा का लादला जात आहे. थकबाकीदारांना सवलत दिली नसती, तरीही अपेक्षित महसूल मिळाला असता.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opposition to the tax proposal