जुना खराडी जकात नाका ते कटकेवाडी बायपासची पाहणी, मोजणी करण्याचे आदेश

kharadi.jpg
kharadi.jpg

वाघोली : जुना खराडी जकात नाका ते कटकेवाडी पर्यंत बायपास करण्यासाठी पाहणी व मोजणी करण्याचे आदेश आमदार अशोक पवार यांनी पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिले. हा डीपी रस्ता असल्याने तो करण्यासाठी अडचणी येणार नाहीत. आमदार अशोक पवार यांनी आज पीएमआरडीए अधिकाऱ्यांसमवेत पुन्हा वाघोलीतील पुणे नगर महामार्गाची पाहणी केली.

Video : Shocking पुण्यात तरुणाची काढली नग्न धिंड; दिले सिगारेटचे चटके

वाघेश्वर चौक ते श्रेयस गार्डन मंगल कार्यालय दरम्यान पीएमआरडीएच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. कामाचा दर्जा चांगला नसल्याने व काही बदल असल्याने ते काम थांबविण्याचे आदेश पवार यांनी आठ दिवसांपूर्वी केलेल्या पाहणी दरम्यान दिले होते. प्रथम जुना खराडी जकातनाका येथून पाहणी करण्यात आली. जुना खराडी जकात नाका ते कटकेवाडी पर्यंत बायपास केल्यास पुणे नगर महामार्गावरील ताण कमी होऊन वाहतूक कोंडीतून सुटका मिळेल. यानंतर वाघोलीत काम सुरू असलेल्या रस्त्याची पाहणी करण्यात आली. वाघेश्वर चौकात एकीकडे सातव स्कूल पर्यंत तर, दुसरीकडे वाघेश्वर तळयापर्यंत जागा असल्याने तेवढे रुंदीकरण करण्यासाठी निधीची तरतूद करण्यासही अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.

इंद्रायणी तांदळाने खाल्ला सोशल मीडियावर "भाव'

तलाठी कार्यालयाजवळील झाडे हलवावी लागणार आहेत. त्याबदल्यात अग्निशमन केंद्र परिसरात झाडे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या सूरु असलेले काम डिसेंबर अखेर पूर्ण करावे असेही पवार यांनी सांगितले. पाहणी दरम्यान अधीक्षक अभियंता विष्णू पालवे, कार्यकारी अभियंता शाम कुंभार, उपभियता राजश्री दिवाण, शाखा अभियंता अमित हासपे, उपअभियंता पाटील, वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे, शिवदास उबाळे, गणेश सातव, गणेश गोगावले, चाचा जाधवराव आदी उपस्थितीत होते.

आमदार रोहित पवारांच्या रिक्त जागेसाठी होणार निवडणूक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com