Otur News : ओतूर वनविभागाकडून विहीरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

जुन्नर येथील तेलदरा येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान
Otur forest department rescues leopard fell into well animal care junnar
Otur forest department rescues leopard fell into well animal care junnarsakal

ओतूर - ता.जुन्नर येथील तेलदरा येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान देण्यात आले आहे. याबाबत ओतूर वनपरीक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी माहिती दिली की ओतूर येथील तेलदरा येथे दशरथ भिवा केदार यांच्या मालकीच्या घर शेजारील विहीरीत बिबट्या पडला.

Otur forest department rescues leopard fell into well animal care junnar
Otur Leopard: नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने लावले सहा पिंजरे

सदर घटना ओतूर वनविभागाला समजताच वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे,वनपाल सुधाकर गीते,वनरक्षक विश्वनाथ बेले, पी.के.खोकले, माणिकडोह बिबट निवारण केंद्रातील पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. चंदण सावणे, बिबट रेस्कुटीम सदस्यचे किसन केदार, फुलचंद खंडागळे ,शिवाजी मधे ,

Otur forest department rescues leopard fell into well animal care junnar
Pune Rain Update : चार धरणात मिळून एक टीएमसीची वाढ; शहरात पाणी कपातीचे संकट

गंगाराम जाधव, भरत पारधी ,साहेबराव पारधी,गणपत केदार याच्या पथकाने विहिरीतल बिबट रेस्कु करून त्या बिबट्यास माणिकडोह बिबट निवारण केंद्रात उपचारासाठी पाठविण्यात आले.

सदर बिबट पहाटे तीन वाजेपर्यंत दरम्यान भक्षाचा पाठलाग करताना विहिरीत पडला असल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून व्यक्त करण्यात आला. हा बिबट मादी असून अंदाजे दिड वर्ष वयाचा असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com