Otur : काळभैरवनाथ जन्माष्टमीनिमित्त श्री काळभैरवनाथ भव्य कलात्मक सभामंडप लोकार्पण सोहळा उत्साहात साजरा.

यानिमित्त २९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे
Otur news
Otur newsesakal

Otur : श्री क्षेत्र खामुंडी ता.जुन्नर येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात काळभैरवनाथ जन्माष्टमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमा बरोबरच श्री काळभैरवनाथ भव्य सभामंडप लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त २९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.त्यात ग्रामस्थ व इतर भाविक भक्ताच्या देणगीतून अंदाजे साडे कोटी रूपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिर व सभामंडपाचा लोकार्पण सोहळा ३, ४ व ५ डिसेंबर असा तीन दिवस साजरा करण्यात.

Otur news
Kitchen Tips : 2 मिनिटात स्वच्छ होतील जळलेली, काळपट भांडी; फक्त फॉलो करा या टिप्स

त्यात ३ डिसेंबर रोजी सकाळी जगद्गुरू संत तुकाराम महाराजसंत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मूर्तींची मोठ्या भक्तिमय वातावरणात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांच्या गजरात,भजन,झांज पथकासह फटाक्यांची आतषबाजी सह नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले, तसेच शालेय विद्यार्थिनींचे लेझिम पथक सह सहभाग घेतला होता.यावेळी महिला ही मोठ्या प्रमाणात मिरवणूकीत सहभाग घेतला.

Otur news
Investment Tips सोन्यात गुंतवणूक म्हणजे दागिने खरेदी नव्हे!

४ डिसेंबरला सर्व देणगीदार कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. मगळंवारी ता.५ डिसेंबर रोजी काळभैरवनाथ जन्माष्टमी निमित्त ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराच्या सभामंडपाचा लोकार्पण सोहळा जगतगुरु शंकराचार्य विद्या नृसिंह स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.त्यात प्रथम जगतगुरु शंकराचार्य विद्या नृसिंह स्वामी यांची गावातून पारंपारिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.

त्यानंतर त्यांच्या शुभ हस्ते श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या मूर्तिची स्थापना करण्यात आली, यावेळी त्यांनी उपस्थित भाविक भक्तांना आपल्या प्रवचनातून मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली.या सर्व कार्यक्रमाचे नियोजन श्रीकाळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मारुती शिंगोटे, कार्याध्यक्ष संदीप गंभीर, उपाध्यक्ष उपेंद्र डुंबरे, सचिव सुभाष बोडके यांनी व सर्व ग्रामस्थ खामुंडी यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com